Nitin Gadkari: ‘पुण्यात हवेतून चालणाऱ्या बसेस आणणार’, गडकरींनी दादांना सांगितलं; बघून घ्या!

मुंबई तक

ADVERTISEMENT

lets bring air flying buses for pune nitin gadkari has made a statement on pune traffic jam
lets bring air flying buses for pune nitin gadkari has made a statement on pune traffic jam
social share
google news

पुणे: पुण्यात (Pune) वाहतूक कोंडीचा (Traffic Jam) प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. अशावेळी आता रस्त्यावरुन अधिक वाहतूक होणं कठीण आहे. अशावेळी पुण्यात हवेतून चालणाऱ्या बसची (Air Flying Buses) आवश्यकता आहे. तर अजितदादा आणि चंद्रकांतदादा तुम्ही त्याबाबत पाहून घ्या.. असं विधान केंद्रीय वाहतूक आणि रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलं आहे. (lets bring air flying buses for pune nitin gadkari has made a statement on pune traffic jam)

ADVERTISEMENT

पुण्यात चांदणी चौक उड्डाणपुलाचं आज (12 ऑगस्ट) लोकार्पण करण्यात आलं. त्याच कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी हवेतून चालणाऱ्या बसेसबद्दल विधान केलं.

हे ही वाचा >> Ajit Pawar: ‘खुर्ची एक असेल तर तिथे दोघांचा डोळा ठेवून..’, CM पदावरुन अजितदादांची तुफान बॅटिंग

पाहा नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले:

‘बंगळुरु ते चेन्नई हा एक्सप्रेस वे देखील बांधून पूर्णत्वाला आला आहे. त्यामध्ये बंगळुरूमध्ये तर पुण्यापेक्षाही अधिक ट्रॅफिकची समस्या आहे. परवाच मला कर्नाटकाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटले. मी त्यांना दोन कल्पना दिल्या..’

‘बंगळुरुत ग्रेनाईट आहे जमिनीच्या खाली. तर पहिला उपाय म्हणजे 50 किमी जमिनीखाली बोगदा.. आपण बंगळुरूच्या खाली भूमिगत बांधू. त्यातून निघालेलं ग्रेनाइट हे मार्केटमध्ये विकू. त्यातून पैसे मिळतील.’

दुसरी मी त्यांना विनंती केली.. आता माझ्याकडेच फॅनाक्यूलर रेल्वे, रोप वे, केबल कार आहे. आम्ही पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी बांधतो आहे. तर मी त्यांना म्हटलं की, माझ्याकडे हवेतून चालणारी स्काय बस डबल डेकर.. त्यात 250 लोकं बसतात.’

‘तर दादा एकदा ते प्रेझेंटेशन तुम्ही बघून घ्या. तुम्ही आणि चंद्रकांतदादा.. आता पुण्यात हवेतून चालणाऱ्या बसेस… तुम्ही चालविण्याबद्दल एकदा अभ्यास करा. कारण पुण्याच्या रस्त्यावर आता वाढायला काही जागा नाही.’

‘मी पुण्यात लहानपणी यायचो.. माझी सवय म्हणजे मी स्पष्ट बोलणारा आहे. त्यामुळे आता पुणं वाढवू नका, पुण्यात गर्दी वाढवू नका.. आहे त्यांना प्रदूषणापासून मुक्त करा आणि चांगली हवा द्या. हे मात्र प्राधान्याने केलं पाहिजे, असं मला वाटतं. मी लहानपणी माझ्या बहिणीकडे यायचो. स्वारगेटजवळ महर्षीनगरमध्ये ते राहायचे. तिथून पर्वती दिसायची.. एवढी सुंदर हवा.. की, त्याची आठवण आजही होते आणि मला ते लक्षात आहे. पण आज पुणे खूप प्रदूषित आहे.’

‘मी अजितदादा आणि चंद्रकांतदादा यांना विनंती करतो. कारण मी वाहतूक मंत्री आहे. मी हे ठरवलं आहे की, पेट्रोल-डिझेलला या देशातून हद्दपार करायचं. त्यामुळे इलेक्ट्रिक, इथेनॉल, बायो-डिझेल, बायो-एलएनजी, बायो-सीएनजी यावर मी स्वत: खूप आग्रहाने काम करतो. मी आता दिल्लीत हायड्रोजनच्या गाडीत फिरतो. इलेक्ट्रिकच्या गाडीत फिरतो..’

‘आता अजितदादा आणि सगळे बसले आहेत.. तुम्हीच इथेनॉल तयार करता. मी पण तयार करतो. इथेनॉल हे स्वदेशी इंधन आहे. त्यामुळे माझी एक इच्छा आहे की, पंतप्रधानांनी दोन वर्षांपूर्वी पुण्यात 3 इथेनॉल पंपाचं उद्घाटन केलं. पण तिथे एकही थेंब इथेनॉल विकलं जात नाहीए.’

‘याचं कारण महाराष्ट्र सरकारने पुण्यातील ज्या ऑटो-रिक्षा आहेत.. माझी दादांना, देवेंद्रजी आणि मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे. की, ज्या ऑटो रिक्षा आहेत त्या फ्लेक्स इंजिनमध्ये कनव्हर्ट करणं. तसंच नवीन ऑटो-रिक्षाचे जे परमिट आहेत ते 100 टक्के इथेनॉल किंवा इलेक्ट्रिकवर देणं. हे जर केलं तर पुण्यातील प्रदूषण कमी होण्यात मोठी मदत मिळेल.’

‘आता टोयाटो कंपनी.. पुण्यातलेच विक्रम किर्लोस्कर जे टोयाटोचे अध्यक्ष होते. पण त्यांचं आकस्मिक निधन झालं. पण त्यांनी शब्द दिला होता. त्यांनी टोयाटो कंपनीची जी केंब्री नावाची गाडी होती त्यामध्ये 40 टक्के वीजेवर चालायची आणि 60 टक्के पेट्रोलवर चालायची.’

‘ऑगस्ट महिन्याच्या शेवटी टोयाटोच्या गाड्या लाँच करणार आहेत. ज्यामध्ये 100 टक्के इथेनॉलवर आणि 40 टक्के वीज तयार करणार. म्हणजे पेट्रोलचा मायलेज लक्षात घेता ते 15 रुपये प्रति लीटर येणार.’

‘दादा आता मला म्हणत होते की, ते कचऱ्यापासून वीज तयार करणार आहेत. पण करू नका.. तुम्हाला माहिती आहे की, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही ग्रीन एनर्जीचे भाव कमी करून टाकले. तुमचं बरं आहे.. आम्ही तिथे साखर कारखान्यात तीन-तीन महिने पगारही देऊ शकत नाही.’

‘तेव्हा आता तुम्ही कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा. ग्रीन हायड्रोजन हे भविष्य आहे. माझ्याजवळ जी गाडी आहे ती जपानमध्ये बनली आहे. ती हायड्रोजनवर चालते. तिचं नाव आहे मिराई.. तिचं अर्थ भविष्य..’

‘यामुळे पुण्याला पेट्रोल-डिझेलपासून मुक्त केलं तर 40 टक्के प्रदूषण कमी होईल. आता इलेक्ट्रिक तर आलंच. आता पुढच्या पाच वर्षात सगळ्या बसेस या इलेक्ट्रिकच्या होणार. आता पुण्यापासून मुंबई-नाशिक नाही तर नागपूरपर्यंत देखील इलेक्ट्रिक बस चालणार.’

‘अजून तुम्ही नाराज व्हायच्या आधीच दादा तुम्हाला सांगतो. आता देवेंद्रजी आणि मी नागपूरच्या रिंगरोडवर केबलवर इलेक्ट्रिक बस सुरू करतोय. परवा टाटाचे लोकं आले होते. जयपूर ते दिल्ली हा एका रिंगरोड बांधला. दिल्लीच्या रिंगरोडमध्ये 30 लाख टन कचरा रोड बनवता वापरला.’

‘पुण्याचा सगळ्या कचरा हा रिंगरोड बनवता वापरला तर पुण्यात कचरा राहणारच नाही. त्याची पॉलिसी आम्ही तयार केली आहे.’ असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT