मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सीएनजी-पीएनजीच्या दरात कपात

ADVERTISEMENT

cng price from mahanagar gas limited and suburbs reduced rs 3 per kg domestic png rates have also been reduced by rs.2 cng and png prices will be reduced to rs 76 per kg
cng price from mahanagar gas limited and suburbs reduced rs 3 per kg domestic png rates have also been reduced by rs.2 cng and png prices will be reduced to rs 76 per kg
social share
google news

CNG-PNG: ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून 1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG gas cylinder) किंमतीत 209 रुपयांनी वाढ केली होती. त्यामुळे नाराजी व्यक्त होत असतानाच मुंबईकरांसाठी मात्र मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून (mahanagar gas limited) आणि उपनगरांमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 3 रुपयांनी कमी केल्या आहेत. त्याच बरोबर देशांतर्गत पीएनजीच्या दरातही 2 रुपयांची कपात करण्यात आली आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत कपात (Price reduction) करण्यात आल्याने मुंबईसह उपनगरात प्रति किलो 76 रुपये आणि देशांतर्गत पीएनजीची किंमत 47 रुपये असणार आहे. (LPG and CNG price reduction mahanagar gas company mumbai city suburbs)

मोठा निर्णय

सीएनजी आणि पीएनजीच्या दराची कपात ही 1 ऑक्टोबर 2023 च्या मध्यरात्री आणि 2 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. गॅस लिमिटेडकडून ही कपात करण्याआधी एप्रिल महिन्यातही सीएनजीच्या किंमतीत 8 रुपये आण पीएनजीच्या दरात 5 रुपयांनी कपात करण्यात आली होती. कपातीपूर्वी शहरात सीएनजीची किंमत 87 रुपये प्रति किलो होती. तर पीएनजीची किंमत 54 रुपये होती.

हे ही वाचा >> ठाकरेंनी वाघ नखाचा मुद्दा तापवला, शरद पवारांनी विरोधाची धारच काढली, म्हणाले…

सर्वसामान्यांसाठी दिलासा

सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत कपात केल्यामुळे मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा असल्याचे मत व्यक्त होत आहे. मुंबईसह उपनगरातील बहुसंख्य वाहने ही सीएनजीवरच चालतात. त्यामुळे झालेली दरकपात ही सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी ठरली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

घरगुती गॅसच्या किंमती जैसे थे

केंद्र सरकारने 1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली मात्र घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आला नाही. तर ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलिंडरवर ग्राहकांना 200 रुपयांचा दिलासा दिला होता.

हे ही वाचा >> Avinash Sable : महाराष्ट्राच्या सुपुत्राची Asian Games मध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी! 3000 मीटरमध्ये…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT