Mukhtar Ansari Death : उलटी झाली अन्... माफिया मुख्तार अन्सारीचा तुरूंगात मृत्यू
Mukhtar Ansari Latest News : मुख्तार अन्सारीला तुरुंगात ठेवण्यात आले होते. तिथेच त्याचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुख्तार अन्सारीचा तुरुंगात मृत्यू

ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला अन्सारीचा मृत्यू

अन्सारीच्या मृत्यूबद्दल रुग्णालयाने काय म्हटलं आहे?
Mukhtar Ansari Death News : बांदा तुरुंगात असलेल्या मुख्तार अन्सारीचे निधन झाले. गुरुवारी संध्याकाळी 8.30 च्या सुमारास कारागृहात मुख्तारची प्रकृती खालावली. उलट्या झाल्यानंतर मुख्तारला राणी दुर्गावती मेडिकल कॉलेजच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये बेशुद्धावस्थेत आणण्यात आले. 9 डॉक्टरांच्या पथकाने तात्काळ उपचार सुरू केले. मात्र, डॉक्टरांच्या खूप प्रयत्नांनंतर हृदयविकाराच्या झटक्याने मुख्तारचा मृत्यू झाला. रात्री 10.30 च्या सुमारास प्रशासनाने मुख्तारच्या मृत्यूची माहिती सार्वजनिक केली. (mukhtar ansari death reason)
माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी दुर्गा शक्ती नागपाल, एसपी अंकुर अग्रवाल यांच्यासह अनेक अधिकारी विभागीय कारागृहात पोहोचले. अधिकारी सुमारे 40 मिनिटे तुरुंगातच होते. यानंतर मुख्तारला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले.
मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. गाझीपूरमधील मऊमध्ये पोलीस फ्लॅग मार्च काढला. मऊ, बांदा आणि गाझीपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. मेडिकल कॉलेज आणि बांदा कारागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुख्तार अन्सारी तुरुंगातच पडला बेशुद्ध
मुख्तार अन्सारी बॅरेकमध्ये अचानक बेशुद्ध पडल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी, मंगळवार, 26 मार्च रोजी त्याला राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते, त्याला स्टूल सिस्टम आणि पोटदुखीचा त्रास होत होता.