Maharashtra HSC Result 2025: ‘MSBSHSE’: बारावीचा निकाल आणि काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी, अजिबात करू नका दुर्लक्ष
Maharashtra HSC Result 2025 Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीची परीक्षा मार्च महिन्यात पार पडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कसा आणि कुठे पाहाल बारावीचा निकाल?

या तारखेला जाहीर होणार बारावीचा निकाल?

कशी असेल ग्रेडिंग सिस्टम?
Maharashtra HSC Result 2025 Update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीची परीक्षा मार्च महिन्यात पार पडली. परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम अंतिम टप्प्यात असून निकाल 15 मे पर्यंत जाहीर केला जाऊ शकतो. राज्यातील लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. परंतु, हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना नेमकं काय करावं लागणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
गतवर्षी 2024 मध्ये बारावीचा निकाल 21 मे रोजी घोषित करण्यात आला होता. तर दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर केला होता. परंतु, यंदाचा बारावीचा निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे, याबाबत शिक्षण मंडळाकडून अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाहीय. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी निकाल कुठे आणि कसा पाहावा, याबाबत आम्ही सविस्तर माहिती सांगणार आहोत.
हे ही वाचा >> पुणे जिल्ह्यात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! संग्राम थोपटेंनी दिला राजीनामा, काय आहे पुढचा प्लॅन?
'या' वेबसाईट्सवर बारावीचा निकाल पाहू शकता
- mahahsscboard.in
- mahresult.nic.in
- hscresult.mkcl.org
- msbshse.co.in
- mh-ssc.ac.in
- sscboardpune.in
- sscresult.mkcl.org
- hsc.mahresults.org.in
12वीचा निकाल 2025 – कशी असेल ग्रेडिंग सिस्टम?
75 टक्के आणि त्यापुढे – Distinction
60 टक्के आणि त्यापुढे – प्रथम श्रेणी (First Class)