Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार, नागपूरमध्ये पुन्हा मुसळधार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maharashtra rain again heavy rain in Nagpur konkan western Maharashtra heavy rain
Maharashtra rain again heavy rain in Nagpur konkan western Maharashtra heavy rain
social share
google news

Rain Update :  पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा परिणाम झाला आहे. सिक्कीम आणि मध्य महाराष्ट्रातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे राज्यातील काही भागात मुसळधार (Heavy Rain) आणि अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. याचा मोठा फटका नागपूरसह परिसराला बसला आहे. शनिवारी नागपूरमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नागपूरमधील (Nagpur) जनजीवन विस्कळीत झाले होते. तर या पावसामुळे चार जणांचा जीवही गेला आहे.  त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील काही भागात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Rain alert) वाढणार असल्याचे हवामान खात्याने (Department of Meteorology) सांगितले. (Maharashtra rain again heavy rain in Nagpur konkan western Maharashtra heavy rain update)

ADVERTISEMENT

राज्यात आणखी तीन दिवस पाऊस

हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 27 सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर कायम असणार आहे. आज रविवारीही पुन्हा एकदा नागपूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूरसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

हे ही वाचा >> Maratha Morcha : ‘…आता माघार घेणार नाही’, जरांगे पाटलांचा पुन्हा थेट इशारा

धरणातील पाणीसाठी भरला

नागपूरसह पुण्यातही पावसांची संततधार सुरुच आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पानशेत, वरसगाव आणि मुळशी धरणाच्या पाणीसाठ्यात 100 टक्के पाणी साठा झाला असून मुळशी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातही संततधार सुरु असून आणखी दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

नागपूरला पुन्हा पाऊस

हवामान विभागाकडून नागपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असल्यामुळे नागपूर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह कोकणातही हलक्या सरींचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

हे ही वाचा >> Nagpur Rain : पूरग्रस्त नागपुरकरांसाठी घोषणा! फडणवीस-गडकरींच्या बैठकीत काय झालं?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT