Maharashtra Weather : डिसेंबर महिन्यात राज्यात थंडीची लाट, 'हे' जिल्हे कुडकुडणार
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात थंडी वाढण्याचा आणि काही भागांत कोल्ड वेव्ह (थंडीची लाट) येण्याचा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार अंदाज
महाराष्ट्रात थंडी वाढण्याचा अंदाज
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात थंडी वाढण्याचा आणि काही भागांत कोल्ड वेव्ह (थंडीची लाट) येण्याचा इशारा दिला आहे. 2 डिसेंबरपर्यंत जारी केलेल्या माहितीनुसार, 3 डिसेंबरपासून उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, तर जाणून घेऊय़ात राज्यातील हवामानाचा एकूण अंदाज.
हे ही वाचा : तरुणाचा नगरपालिकेच्या मतदानासाठी ऑस्ट्रेलिया ते सांगली प्रवास, दीड लाख रुपये खर्च करून मतदानाचा बजावला अधिकार
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वातावरण कोरडं राहण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्र विभागात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांपैकी धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि पुणे घाटमाथ्यावरील भागात हवामान विभागाने थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच उर्वरित कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हवामान विभागाने थंडीचा अलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातर, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच याच विभागात तापमानात घट निर्माण झाली असून गारठा वाढण्याची शक्यता आहे.










