तरुणाचा नगरपालिकेच्या मतदानासाठी ऑस्ट्रेलिया ते सांगली प्रवास, दीड लाख रुपये खर्च करून मतदानाचा बजावला अधिकार
Sangli News : एक तरुण तब्बल दीड लाख रुपये खर्च करून नगरपालिकेच्या मतदानासाठी आला आहे, त्या मतदाराची जोरदार चर्चा होताना दिसते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दीड लाख रुपये खर्च करून मतदाराने दिलं मत
मतदान हे श्रेष्ठदान आहे, याचं एक उत्तम उदाहरण
Sangli News : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक (2 डिसेंबर) रोजी पार पडली आहे. अशातच काही जिल्ह्यांमध्ये राजकीय नेत्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा होताना दिसत आहे. काही ठिकाणी मारहाणीचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदार आणून पैशांचे वाटप देखील करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला. अशातच एक तरुण तब्बल दीड लाख रुपये खर्च करून आपल्या गावी मतदानासाठी आला आहे, त्या मतदाराची जोरदार चर्चा होताना दिसते.
हे ही वाचा : सुनील तटकरेंनी हल्ला करायला सांगितला, माझ्यावरच बंदूक रोखली, गोगावलेंच्या मुलाचा धक्कादायक आरोप
दीड लाख रुपये खर्च करून मतदाराने दिलं मत
मतदान हे श्रेष्ठदान आहे, याचं एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे. अन्सारी मुल्ला (वय 25) हा तरुण सांगलीतील शिराळा येथे नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी तब्बल दीड लाख रुपये खर्च करून आला. तो 2019 पासून ऑस्ट्रेलियात नोकरी करतो. पण, आपल्या मताचा हक्क बजावण्यासाठी त्याने शिराळा गाठलं. त्याला पाहून त्याच्या मित्रांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत त्याचे स्वागत केले.
सिडनीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत करतो नोकरी
तसेच अन्सारी मुल्लाचे वडील कासम मुल्ला हे शिराळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते. काही वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले. एम.टेक. झालेल्या अन्सारीने सिडनीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळवली. नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांबाबत त्याच्या कुटुंबियांनीच त्याला सांगितले असता, त्यानंतर त्यांनी कन्या शाळा मध्ये आपला हक्क बजावला.
हे ही वाचा : रायगड नगरपरिषदेच्या निवडणुकीत तुफान राडा, भरत गोगावलेंच्या मुलावर बंदूक रोखली, सुशांत जबरेंना बेदम मारहाण
एका बाजूला दीड लाख रुपये खर्च करून नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आलेला अन्सारी मुल्ला, तर दुसरीकडे याच निवडणुकीत पैसे वाटत फिरणार्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा फरक जाणवला आहे. प्रत्येक मत हे पैशाने विकत घेता येतच असे नाही, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.










