सुनील तटकरेंनी हल्ला करायला सांगितला, माझ्यावरच बंदूक रोखली, गोगावलेंच्या मुलाचा धक्कादायक आरोप
Bharat Gogavale Son On Sunil tatkare : रायगड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना नेते भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुनिल तटकरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना समोर आली. या दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भरत गोगावलेंच्या मुलाचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप
कार्यकर्त्यांनी बंदूक हिसकावून घेतली
Bharat Gogavale Son On Sunil tatkare : राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीला गालबोट लावणारी घटना महाडमध्ये घडली आहे. महाडमध्ये शिवसेना नेते भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुनिल तटकरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना समोर आली. या दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता सुशांत जाबरे यांना बेदम मारहाण करत गाडीच्या काचा फोडण्यात आल्या, त्यानंतर सुशांत जाबरे यांनी विकास गोगावलेंवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भरत गोगावलेच्या मुलाने केला.
हे ही वाचा : रायगड नगरपरिषदेच्या निवडणुकीत तुफान राडा, भरत गोगावलेंच्या मुलावर बंदूक रोखली, सुशांत जबरेंना बेदम मारहाण
भरत गोगावलेंच्या मुलाचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप
या प्रकरणात आता विकास गोगावले यांनी थेट सुनिल तटकरेंवर गंभीर आरोप केलेत. सुनिल तटकरे यांनीच हा हल्ला चढवला असून त्यांनी माझ्यावर बंदूक रोखण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप विकास गोगावले यांनी केला. त्यानंतर विकस गोगावले म्हणाले की, मी दोन ते तीन वेळा बुथवर कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी गेलो असता, काही लोक कारमधून उतरले आणि आले, नंतर त्यांनी आमच्यावर हल्ला चढवला. त्यावर विकास गोगावले म्हणाले की, 'माझ्या कार्यकर्त्याने ती बंदूक हिसकावून घेतली, नाहीतर मला गोळी लागली असती', असे ते म्हणाले.
कार्यकर्त्यांनी बंदूक हिसकावून घेतली
हा सर्व प्रकार घडला तेव्हा पोलीस पलिकडच्या बाजूला उभे होते. समोरच्या गर्दीतून आलेले लोक हे साधारणत: आंध्र प्रदेश, दिल्ली आणि कोलकातासारख्या ठिकाणाहून आल्याचा त्यांना संशय होता. तेव्हा गाडीमध्ये हॉकी स्टीक होते. त्याचक्षणी कार्यकर्त्यांनी बंदूक हिसकावून घेतली, असं विकास गोगावले म्हणाले. नंतर त्यांनी सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला सुशांत जाबरे यांनी केला.
हे ही वाचा : विधवा महिला शेतात प्रियकराला भेटायला गेली, दीर आणि सासऱ्याने रंगेहात पकडलं अन्... अखेर घडली भयानक घटना
दरम्यान, पुढे विकास गोगावले म्हणाले की, हा रडीचा डाव सुरु आहे. लढायचं असेल तर आपण समोर येऊन लढावं. विकास गोगावलेशी लहान मुलासारखं लढू नका. मी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी जात असल्याचं विकास गोगावले म्हणाले होते.










