रायगड नगरपरिषदेच्या निवडणुकीत तुफान राडा, भरत गोगावलेंच्या मुलावर बंदूक रोखली, सुशांत जबरेंना बेदम मारहाण

मुंबई तक

Bharat Gogawale : विकास गोगावले विरुद्ध सुशांत जाबरे या दोन्ही समर्थकांमध्ये मोठी हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. या मारहाणीत भरत गोगावलेंच्या मुलावर बंदुक रोखल्याचा आरोप करण्यात आला.

ADVERTISEMENT

Bharat Gogawale
Bharat Gogawale
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रायगडमध्ये मोठा राडा  

point

विकास गोगावलेंवर बंदुक रोखल्याचा आरोप

Bharat Gogawale : राज्यातील 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (2 डिसेंबर) रोजी मतदान सुरू आहे. राज्यातील जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात सध्या मतदानाची रणधुमाळी सुरू आहे. अशातच काही नगरपरिषदांमध्ये मोठ्या प्रमाणात तुफान राडा होताना बघायला मिळत आहे. अशातच आता रायगडमध्ये मोठी दंगल झाली आहे. गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थकांमध्ये मोठा राडा झाला आहे. भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले यांच्यावर बंदूक रोखल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. याचपार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

हे ही वाचा : Buldhana Nagarpalika election : "बोगस मतदार पकडला, स्थानिकांनी हाणला, आमदार पुत्राच्या मदतीने पळाला"

रायगडमध्ये मोठा राडा  

विकास गोगावले विरुद्ध सुशांत जाबरे या दोन्ही समर्थकांमध्ये मोठी हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. या हाणामारीत सुशांत जाबरे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. या मारहाणीमुळे आता महाडमध्ये मोठी दंगल झाल्याचे चित्र आहे. यामुळे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या तुफान राड्यात सुशांत जाबरेच्या गाडीची तोडफोड करत मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात सुशांत जाबरेच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्याचे वृत्त आहे. 

विकास गोगावलेंवर बंदुक रोखल्याचा आरोप

सुशांत जाबरे हे आधी शिवसेना पक्षात होते, पण नंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सुशांत जाफरे यांनी महाड येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अशातच आता सुशांत जाफरे हे महाड मधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले असता मोठा राडा झाला. तेव्हा भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावलेंवर बंदुक रोखल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. विकास गोगावले हे रिव्हॉल्व्हर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याची माहिती आहे, परिस्थिती बघता, पोलीस काय कारवाई करतील हे बघणं गरजेचं आहे. 

हे ही वाचा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मतदानाच्या टक्केवारीबाबत महत्त्वाची अपडेट, फक्त मुंबई Tak वर

काय म्हणाले उदय सामंत? 

महायुतीच्या दृष्टीने दुर्दैवी घटना आहे. जिथे युती नव्हती तिथे मैत्रीपूर्ण निवडणूक होणं अपेक्षित होते. तिन्ही नेत्यांनी सांगितलं होतं, पण महाडचं राजकारण बघता वेळीस लक्ष घालणं गरजेचं होतं. आमचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांचं म्हणणं लक्षात घेणं गरजेचं होतं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीसाठी देखील जीव ओतून काम केलं होतं, हे देखील समजून घेणं गरजेचं होतं. रायगडमध्ये जो राडा झाला त्याच भरत गोगावलेंची बाजू समजून घेणं गरजेचं होतं. मंत्री म्हणून भरत गोगावले आणि त्यांच्या मुलाला अडचणीत आणावं यासाठी हे केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांसोबत समन्वय साधण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेतला होता. ती गोष्ट लक्षात न घेतल्याने त्याचं रुपांतर हे मारहाणीत झाल्याचं उदय सामंत म्हणाले.  
 

हे वाचलं का?

    follow whatsapp