Maharashtra Weather: सावधान! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; वाचा IMD रिपोर्ट
Mumbai Weather Forecast Today : राज्यातील बहुतांशी भागात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप पाहायला मिळाली. पण आता राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढता दिसत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला
मुंबईत कसं असणार हवामान?
'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
Mumbai Weather Forecast Today : राज्यातील बहुतांशी भागात मागील काही दिवसांपासून पावसाची उघडीप पाहायला मिळाली. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसल्या, अशातच आता राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढताना दिसत आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रामध्ये आजपासून मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आज (23 सप्टेंबर) मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मुंबईबरोबरच पालघर, ठाणे या जिल्ह्यामध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तुमच्या शहरात वातावरण कसं असेल जाणून घेऊयात... (maharashtra Weather Forecast today 23 September 2024 IMD alert to these districts know weather report of mumbai pune)
ADVERTISEMENT
राज्याभरामध्ये या आठवड्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह दमदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर, बीड, नगर, नांदेड, हिंगोली, परभणी, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा : Bigg Boss Marathi : निक्की रडरड रडली...बिग बॉसने अरबाजला दाखवला बाहेरचा रस्ता
मुंबईत कसं असणार हवामान?
मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटांसह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या कालावधीत काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेत हवामान विभागाने आज (23 सप्टेंबर) रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यानुसार, या ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : महिलांनो, तुमच्या 'या' खात्यात 4500 होणार जमा?
उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. त्यानुसार, 26 ते 30 दरम्यान, या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT