Maharashtra Weather: कुठे 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा तर कुठे मुसळाधार! तुमच्या शहरात पावसाचा अंदाज काय?
Mumbai Weather Forecast Today : राज्यात परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दणका दिला आहे. मात्र अनेक भागात ऑक्टोबर हीटचा तडाखा सोसावा लागत आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
कुठे 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा तर कुठे मुसळाधार!
मुंबईत प्रचंड उकाडा वाढणार?
'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता...
Mumbai Weather Forecast Today : राज्यात परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दणका दिला आहे. मात्र अनेक भागात ऑक्टोबर हीटचा तडाखा सोसावा लागत आहे. उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. चला तर मग तुमच्या शहरात आज (08 ऑक्टोबर) पावसाची स्थिती कशी असेल जाणून घेऊयात. (maharashtra Weather Forecast updates october heat mumbai pune today 08 october 2024 know IMD weather report)
ADVERTISEMENT
ऑक्टोबर महिन्याला सुरूवात होताच हवामानात अनेक बदल झाले. काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली तर कुठे मुसळधार हजेरी लावली. अशात उन्हाचा तडाखाही वाढला. पण आता नैऋत्य मोसमी वारे परतण्यास अनुकूल वातावरण झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे 'ऑक्टोबर हीट'ने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Navratri Shocking Video: गरबा खेळताना डान्सरचा मृत्यू! पुण्यातील 'हा' धक्कादायक व्हिडीओ पाहाच
मुंबईत प्रचंड उकाडा वाढणार?
मुंबईत उकाडा प्रचंड वाढला आहे. आता मुंबई शहरासह उपनगरात मध्यम पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडू शकतो. आज, 8 सप्टेंबर रोजी मुंबईचे कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे.
हे वाचलं का?
'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता...
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात आज 28 अंश सेल्सिअस कमाल आणि 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असू शकतं.
पुण्यातील कमाल तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांत 31 ते 33 अंश सेल्सिअसच्या घरात होतं. येत्या दोन ते तीन दिवसांत आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : ladki Bahin Yojana : महिलांनो! 'या' दिवशी खात्यात जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे; CM शिंदेंनी दिली अपडेट
मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांनाही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात येतंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 28 अंश सेल्सिअस कमाल आणि 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असण्याचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT