Maharashtra Weather : पुण्यासह 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra weather news meteorological department weather forecast for next 24 hours 25th august 2024 red alert for pune raigad satara heavy rainfall prediction
'या' जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आज पावसाने हजेरी लावली

point

उद्या रविवारी देखील असाच पाऊस राहणार

point

पुण्यासह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा

Maharashtra Weather Update : ऑगस्ट महिन्यात सुट्टीवर गेलेला पाऊस आता पुन्हा एकदा परतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आज पावसाने हजेरी लावली होती. उद्या रविवारी देखील असाच पाऊस राहणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्याआधी एकदा हवामानाच अंदाज नक्की पाहा. कारण पुण्यासह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. (maharashtra weather news meteorological department weather forecast for next 24 hours 25th august 2024 red alert for pune raigad satara heavy rainfall prediction)

ADVERTISEMENT

'या' जिल्ह्यात रेड अलर्ट 

 पुण्यातील खडकवासला धरणातून आज पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मुठा नदीतूनही पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यात उद्या पुण्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यासह रायगड आणि साताऱ्यालाही रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट 

रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट  इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज देखील मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाने दमदार बँटींग केली होती. उद्या देखील असाच पाऊस पडण्याची शक्यता आहेय.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : बँक खात्यात योजनेचे पैसेच आले नाही, लाडक्या बहिणींनी काय करायचं?

यलो अलर्ट 

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नंदूरबार, धुळे, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

कुठे किती पाऊस पडला? 

राज्यात शनिवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. डहाणूत सर्वाधिक 111 मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी आणि सांताक्रुजमध्ये ४७ मिमी, कुलाब्यात 17 मिमी आणि हर्णेत 21 मिमी पाऊस पडला आहे. पश्चिम घाटात महाबळेश्वरमध्ये 62 मिमी, जळगावात 22 मिमी, नाशिकमध्ये 23 मिमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 मिमी, धाराशिव आणि उदगीरमध्ये 11 मिमी, यवतमाळमध्ये 48 मिमी, चंद्रपुरात 17 मिमी, बुलडाण्यात 12 आणि अमरावतीत 15 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Unified Pension Scheme : नोकरी सोडल्यानंतर पेन्शन म्हणून 10 हजार मिळणार, सरकारची नव्या योजनेला मंजूरी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT