Ladki Bahin Yojana : बँक खात्यात योजनेचे पैसेच आले नाही, लाडक्या बहिणींनी काय करायचं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme installment amount 3000 does not deposite to your bank account what should do mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde
काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसेच जमा झाले नाहीयेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट पैसे जमा

point

महिला आता तिसऱ्या हप्त्याची वाट पाहतायत.

point

काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसेच जमा झाले नाहीयेत.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे या महिला आता तिसऱ्या हप्त्याची वाट पाहतायत. मात्र काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसेच जमा झाले नाहीयेत. त्यामुळे अशा महिलांनी नेमकं काय करायचं? हे जाणून घेऊयात. (ladki bahin yojana scheme installment amount 3000 does not deposite to your bank account what should do mukhyamantri ladki bahin yojana scheme aditi tatkare ajit pawar eknath shinde)

ADVERTISEMENT

अर्ज करूनही अद्याप तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील, तर पहिल्यांदा तुमचे आधारकार्ड बँकशी लिंक आहे की नाही ते तपासून घ्या. जर तुमचे आधारकार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे सर्वांत आधी बँक खाते आधारशी लिंक करून घ्या. 

हे ही वाचा : Ajit Pawar: 'माझ्या भाषेत सांगायचं तर सा&*X काढून टाकलं पाहिजे...' भर सभेत अजितदादा काय बोलले?

जर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे आणि तुमचे आधार देखील बँकेशी लिंक आहे. तुम्हाला मेसेज देखील आला असेल तर सर्वांत आधी बँकेशी संपर्क साधा. कारण तुम्ही तुमच्या खात्यात कमी बँलेन्स मेनटेन ठेवले असल्या कारणाने तुमची रक्कम खात्यातून वजा झाली असण्याची शक्यता आहे. अशा घटनांमध्ये आता सरकारने बँकांना महिलांचे पैसे वजा न करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचसोबत ज्या महिलांचे वजा केले आहेत त्यांना परत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या महिलांना परत पैसे मिळणार आहेत. 

हे वाचलं का?

महिलांनी अर्जात भरलेली त्यांची बँक डिटेल्स पून्हा तपासून घ्यावी. तसेच जर तुमचा अर्ज मंजूरच झाला नाही. तुम्हाला पुन्हा रिसबमिटचा पर्याय दिला असेल तर तुम्ही पुन्हा माहिती भरून सबमिट करू शकता. त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होऊन तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. 

हे ही वाचा : Yavatmal News : शिंदेंच्या भाषणा दरम्यान 'लाडक्या बहिणीं'नी घातला गोंधळ, नेमकं काय घडलं?

दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरु आहे. 31 जुलै पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. 31 जुलैनंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरु आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2 कोटी 6 लाख 14 हजार 990 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 1 कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज पात्र ठरले आहेत. तर 42 हजार 823 अर्जाची पडताळणी सुरु आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT