Maharashtra Weather : कोकणातील 'या' भागात पावसाचा अंदाज, तर काही ठिकाणी पावसाची स्थिती स्थिर, कसं असेल हवामान?
Maharashtra Weather : हवामान विभाग (IMD) नुसार, 21 सप्टेंबर 2025 रोजी हवामानाची शक्यता कायम राहणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

हवामान विभागाचा अंदाज

21 सप्टेंबर 2025 रोजी हवामानाची शक्यता कायम

कसं असेल हवामान?
Maharashtra Weather : हवामान विभाग (IMD) नुसार, 21 सप्टेंबर 2025 रोजी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. राज्यात शक्यतो सध्या कोकण भागात पावसाची तीव्रता जाणवत आहे. तर नुकतंच मराठवाड्यातही पूरजन्यस्थिती निर्माण झाली आहे. जाणून घेऊयात राज्यातील 21 सप्टेंबर रोजीचा हवामानाचा एकूण अंदाज जाणून घेऊयात.
हे ही वाचा : गोपीचंद पडळकरांची जीभ छाटणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस, बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक
कोकण विभाग :
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या विभागाचा समावेश होती. याच विभागात हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार पावसासह हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र :
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा अंदाज जारी केला आहे. या एकूण विभागांत हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज जारी केला आहे.