Maharashtra Weather : राज्यात वरुणराजाचं रौद्ररुप, 'या' जिल्ह्यांचं काही खरं नाही

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची स्थिती असणार आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील अशी शक्यता वर्तविण्यात येते, जाणून घ्या एकूण अंदाज.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस

point

कोकणात पावसाचा यलो अलर्ट

point

जाणून घ्या एकूण हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची स्थिती असणार आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील अशी शक्यता वर्तविण्यात येते. कोकणात पावसाचा यलो अलर्टची शक्यता आहे. तर रायगड जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्टची शक्यता आहे. अशातच 30 ऑगस्ट रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलाय.  

हे ही वाचा : बँकेत काम करणाऱ्या पायलसोबत भयंकर घडलं, अपघात वाटत असतानाच वेगळाच खुलासा!

कोकण 

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. तर रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्टची शक्यता वर्तवण्यात आली. 

उत्तर महाराष्ट्र 

धुळे, नाशिक, नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अहिल्यानगरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्टची शक्यता वर्तवलेली आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा येथे विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस, तर सोलापूरमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.