तिसरीही मुलगी जन्मली, क्रूर बापाने नवजात बाळाचा गळा दाबून संपवलं

मुंबई तक

Crime News : मुलगी जन्मली म्हणून वडिलांनीच नवजात मुलीचा गळा दाबत हत्या केली. जन्मलेली मुलगी हे तिसरं मुल असल्याने वडिलांनी असं क्रूर कृत्य केलं. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

वडिलांची तिसरा मुलगा जन्माला यावा ही अपेक्षा

point

जन्मलेल्या मुलीचा वडिलांनी गळा दाबला

Crime News : जयपूर ग्रामीण भागातील चंदवाजी ठाणे क्षेत्रात नात्याला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. मुलगी जन्मली म्हणून वडिलांनीच नवजात मुलीचा गळा दाबत हत्या केली. जन्मलेलं बाळ हे तिसरं मुल असल्याने वडिलांनी असं क्रूर कृत्य केलं. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

हे ही वाचा : मुलगा मानसिक रुग्ण, विटेनं हल्ला करत आईची हत्या; बहिणीला देखील सोडलं नाही 

वडिलांची तिसरा मुलगा जन्माला यावा ही अपेक्षा

घडलेल्या घटनेनुसार, नीमरानी येथील रहिवासी आरोपी रवि कुमारच्या पत्नीचे चंदवाजी येथील एका रुग्णालयात सिझर ऑपरेशन झालं. महिलेनं मुलीला जन्म देखील दिला. कुटुंबात आधी दोन मुली जन्मल्या होत्या, नवरा रवि कुमारला मुलगा जन्माला यावा अशी अपेक्षा होती. मात्र, मुलीचा जन्म झाल्याची माहिती समजताच, तो संतापला होता.  

जन्मलेल्या मुलीचा वडिलांनी गळा दाबला

आरोप असा की, तिसऱ्या जन्मलेल्या मुलीचा वडिलांनी गळा दाबला. तेव्हा कुटुंबातील सदस्यामध्ये तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही हालचाल दिसून आली नव्हती. या घटनेनंतर, आरोपी वडिलांवर खुनाचा संशय आल्याने तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, चांदवाजी पोलीस ठाण्याचे पथक फौजफाट्यासह घटनास्थळी आले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. 

हे ही वाचा : 12 वर्षीय मुलाचा बाराव्या मजल्यावरून तोल जाऊन मृत्यू, शेजारच्यांकडून कुटुंबाला माहिती

संबंधित प्रकरणाची पुढील कायदेशीर कारवाई होत आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, घटनेचा नेमका वेळ-काळ आणि पुरावे गोळा करता यावेत यासाठी पोलीस रुग्णालयात आहेत. संबंधित सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी करण्यात आली.