12 हजार पगार पण दोघींचा मोठा रूबाब, करोडो रुपयांच्या कार अन्.. दोन शिक्षिकांचे भलतेच धंदे!
केरळमध्ये केवळ 12 हजार रुपये पगार असलेल्या दोन महिला शिक्षिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेचं कारण जेव्हा समोर आलं तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.
ADVERTISEMENT

कोझिकोड: केरळमधील दोन महिला शिक्षिकांना अमली पदार्थांच्या पुरवठा नेटवर्कमध्ये सामील असल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. MDMA अंमली पदार्थ प्रकरणात त्यांची नावे समोर आल्यानंतर, समग्र शिक्षा केरळने त्यांना नोकरीवरून काढून टाकले. या दोन महिला शिक्षिका, शारीरिक शिक्षण प्रशिक्षक के.सी. कीर्तना आणि विशेष शिक्षिका के. काव्या, कोझिकोड जिल्ह्यातील पेराम्ब्रा ब्लॉक रिसोर्स सेंटर (BRC) शी संबंधित होत्या. दोघीही तात्पुरत्या विशेष शिक्षिका म्हणून काम करत होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांचा पगार महिन्याला 12,000 रुपये असूनही, त्यांच्याकडे चैनीच्या वस्तूंची कमतरता नव्हती.
12,000 रुपयांच्या पगारात आलिशान लाइफस्टाइल
महिन्याला 12,000 रुपये कमावणाऱ्या व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचे आलिशान जीवन त्या दोन्ही शिक्षिका जगत होत्या. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे महागड्या गाड्या होत्या आणि त्या त्यांच्या उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त खर्च त्या करत होत्या. यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये संशय निर्माण झाला की, इतक्या पगारात त्या अशा उधळपट्टीच्या गोष्टी कशा काय करू शकतात? त्यांनी ही बाब अधिकाऱ्यांकडे कळवली.
हे ही वाचा>> सहावीतील विद्यार्थिनीला रिकाम्या वर्गात न्यायचा अन्..., 50 वर्षीय शिक्षक निलंबित
दोन्ही महिला शिक्षिकांचे ड्रग्ज कनेक्शन
या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यावर धक्कादायक खुलासे झाले. तपासकर्त्यांनी सर्वप्रथम सफवान नावाच्या एका व्यक्तीला एमडीएमए (MDMA) सोबत ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर, पोलिसांनी एका सुसंघटित ड्रग्ज वितरण नेटवर्कचा पर्दाफाश केला. कोझिकोड ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेल्या 'ऑपरेशन तुफान' या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेदरम्यान या दोन महिला शिक्षिकांना अटक करण्यात आली.
हे ही वाचा>> बायकोचे दोन दिरांसोबत संबंध, नवऱ्याला संपवण्यासाठी जेवणात विष मिसळल्याचा आरोप
तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ग्राहक ड्रग्ज मागवण्यासाठी आखाती देशातील एका फोन नंबरवर संपर्क साधत असत. त्यांना पेमेंटसाठी एक क्यूआर कोड (QR code) मिळत असे. पेमेंटची पुष्टी झाल्यावर, खरेदीदारांना लपवलेल्या 'डेड-ड्रॉप' ठिकाणांचे (जिथे ड्रग्ज लपवले होते) फोटो किंवा ठिकाणे पुरवली जात होती.
