Maharashtra Weather : मुंबईला बरसणार! तुमच्या जिल्ह्यासाठी काय आहे अंदाज?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Monsoon Updates : आज (14 जून) सकाळी मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसाच्या रिमझिम सरी बरसताना पाहायला मिळल्या. जवळपास दोन दिवसानंतर पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर हवामान विभागने पुढील 24 तासांत मुंबईत हलक्या पावसासह ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवली आहे. (Maharashtra Weather rainy weather in mumbai know What is the forecast of your district

ADVERTISEMENT

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर भागात मध्यम ते हलक्या अशा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. तसंच राज्यातील 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिल्याची माहिती आहे. या जिल्ह्यांमध्ये विदर्भातील यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिम यांसह रत्नागिरी, पुणे, ठाणे, लातूर, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, उस्मानाबाद यांचा समावेश आहे. 20 जूननंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची माहितीही हवामान खात्याने दिली आहे.

हेही वाचा : Indresh kumar : "अहंकारी झाले म्हणूनच 241 जागा मिळाल्या", RSS ची भाजपवर तोफ

पावसाच्या आगमनाने शेती कामांना सुरूवात

खेड्या-पाड्यात चांगला पाऊस पडला आहे. नदी, ओढे आणि धरणे ओसंडून वाहू लागले आहेत. शेतकरी राजा सुखावला आहे. यामुळे शेतीच्या कामांना सुरूवात झाली आहे. उन्हाच्या तडाख्याने आणि  पाण्याअभावी शेतकऱ्यांसह, गावकरी हैराण झाले होते. पण आता त्यांना दिलासा मिळालेला आहे.

हे वाचलं का?

कोकण विभागात मुसळधार पावसाची शक्यता

कोकणात चांगला पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 16 जूनपर्यंत रत्नागिरी आणि चिपळूण भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे गावकऱ्यांसह वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  

हेही वाचा : Ajit Pawar : लोकसभेचा निकाल लागताच अजित पवारांच्या अडचणी वाढल्या!

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात कोसळली दरड

गेल्या 8 दिवसांपासून कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत गुरूवारी 13 जून रोजी सायंकाळी उशिरा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळली. या घटनेमुळे रस्ता बंद करण्यात आला. रत्नागिरीतून अणुस्कुरा घाटामार्गे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात करण्यात आली. 

ADVERTISEMENT

हेही वाचा : Maharashtra : शिंदेच्या आमदाराचा महायुतीलाच घरचा आहेर

सार्वजनिक बांधकाम विभागाने ही दरड हटवण्यासाठी घटनास्थळी पोहोचून काम सुरू केले आहे. अणुस्कुरा घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात.  

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT