Maharashtra Weather : राज्यात अतिमुसळधार मान्सून, 29 जिल्ह्यांवर मोठं संकट
Maharashtra Weather : राज्यातील काही जिल्ह्यांत मान्सून हजेरी लावणार असून काही ठिकाणी समाधानकारक मान्सून आहे. विशेषत: कोकण विभागात पुढील काही तास हे महत्त्वाचे आहेत. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे, जाणून घ्या 30 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानचा अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोकण विभागात पुढील काही तास हे महत्त्वाचे
30 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यातील काही जिल्ह्यांत मान्सून हजेरी लावणार असून काही ठिकाणी समाधानकारक मान्सून आहे. विशेषत: कोकण विभागात पुढील काही तास हे महत्त्वाचे आहेत. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. 29 जून रोजी बहुतांश ठिकाणी मान्सूनने जोर धरला आहे. 23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, तर 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे. जाणून घ्या 30 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानचा अंदाज.
हे ही वाचा : 3 नराधमांनी तरुणीला हॉटेलवर नेलं, पीडिता नग्नावस्थेत... व्हिडिओ व्हायरल
कोकण
कोकण विभागात सर्वाधिक मान्सूनचा प्रभाव असणार आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईसह काही ठिकाणी विजांसह कडकडाटसह वादळी वाऱ्यांसह मान्सून दाखल होणार आहे. याच जिल्ह्यांना मान्सूनचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची अधिक शक्यता आहे. या सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला. कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा परिसरात येथे मुसळधार पावसाचा यलो अलर्ट आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, धुळे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. नंदुरबार जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.









