Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं संकट, हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यातील काही भागांमध्ये हवामान बदल दिसून येत आहे. ढगाळ वातावरणाची परिस्थिती काही भागात दिसून येत आहे. सोमवारी म्हणजे 2 फेब्रुवारी रोजी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, जाणून घेऊयात राज्याची एकूण हवामानाची परिस्थिती.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील काही भागांमध्ये हवामानात बदल

point

काही भागात ढगाळ वातावरणाची परिस्थिती

Maharashtra Weather : राज्यातील काही भागांमध्ये हवामानात बदल दिसून येत आहे. काही भागात ढगाळ वातावरणाची परिस्थिती दिसून येत आहे. सोमवारी म्हणजे 2 फेब्रुवारी रोजी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊयात राज्यातील एकूण हवामनाची परिस्थिती. 

हे ही वाचा : '...नाहीतर मीही अनेक गोष्टी सांगू शकतो', 'त्या' विधानाने मोठी खळबळ.. NCP विलिनीकरणावर CM फडणवीस असं का म्हणाले?

कोकण : 

कोकण किनारपट्टीवर हवामानात बदल जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईत सकाळी वेळेत धुक्याची शक्यता आहे. तसेच ठाणे जिल्ह्यात हवामानाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

 पश्चिम महाराष्ट्र :  

पश्चिम महाराष्ट्रात काही भागांमध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता राहिल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुणे शहरात सकाळी थंडावा जाणवेल, तर दिवसभर आकाश स्वच्छ राहील. 

मराठवाडा :  

मराठवाडा विभागात हवामान विभागाने काही ठिकाणी हवामान बदलण्याची शक्यता आहे. याच विभागातील छत्रपती संभाजीनगरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp