Maharashtra Weather : धो धो बरसणार! महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. खेड्या-गावात तर नद्या, ओढे आणि धरणं ओसंडून वाहू लागले आहेत. तर शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. अशावेळी हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे. (maharashtra weather update which districts of maharashtra have alert by IMD)

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार,  राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांसह कोकणात पुढील 4 दिवस धो-धो पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हेही वाचा: Modi 3.O: नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचं नुकसान, नेमकं कसं?

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा?

विदर्भातील अनेक जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट दिला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा: "आमच्यामुळे भाजपच्या 18 जागा पडल्या", आंबेडकरांनी सांगितलं कारण 

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता आज संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा: Manoj Jarange: प्रकृती खालावली तरी, जरांगेंचा उपचार घेण्यास नकार!

याशिवाय, पुणे, पालघर, अहमदनगर, सातारा, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT