Maharashtra Weather Forecast : घरीच थांबा! मुंबई-पुण्यासह 9 जिल्ह्यांना अलर्ट

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

maharashtra, mumbai, pune weather updates
maharashtra, mumbai, pune weather updates
social share
google news

Maharashtra weather forecast news : गेल्या आठवडाभरापासून राज्यातील विविध भागात पावसाचा जोर कायम आहे. कोकणासह राज्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईसह 9 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे काम असेल, तरच घराबाहेर पडा. (maharashtra weather alert today)

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. राज्याच्या काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, तर दुर्घटनाही घडल्या आहेत. पुढील काही दिवस राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबई-पुण्यासह 9 जिल्ह्यांना अलर्ट

23 जुलै रोजी कोकणासह काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला असून, यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून, यलो अलर्ट दिला गेला आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> Irshalwadi Landslide : 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू,अखेर मृतांची नावं आली समोर

वाचा >> Video : प्रेमाने मिठी मारली,गालावर किस, ‘विराट’च्या भेटीने WI क्रिकेटपटूची आई भारावली

कोकणात पावसाचा जोर कायम राहणार

24, 25 आणि 26 जुलै पर्यंतचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. यात कोकणात मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याचा इशारा दिला गेला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच राहणार आहे. या जिल्ह्यांना तीनही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात मुसळाधर ते मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT