Mallika Rajput : भय्यू महाराजांवर खळबळजनक आरोप केलेल्या मल्लिका राजपूतचा गुढ मृत्यू
Mallika Rajput Suicide,Bhaiyyu Maharaj : मल्लिका राजपूतच्या (Mallika Rajput) या मृत्यूनंतर स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांचे नाव चर्चेत आले आहे. कारण भय्यू महाराज( Bhaiyyu Maharaj) यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केले होते. हे आरोप करणारी अभिनेत्री ही मल्लिका राजपूत होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भय्यू महाराजांवर फसवणूकीचा आरोप केला होता

भय्यू महाराज वेगवेगळ्या नंबरवरून फोन करायचे

भय्यू महाराजांवर आरोप केल्यानंतर मल्लिका चर्चेत आली
Mallika Rajput Suicide,Bhaiyyu Maharaj : प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री मल्लिका राजपूतच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी 13 फेब्रुवारीला घरात संशयास्पद अवस्थेत मल्लिकाचा मृतदेह आढळला होता. मल्लिका राजपूतच्या (Mallika Rajput) या मृत्यूनंतर स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांचे नाव चर्चेत आले आहे. कारण भय्यू महाराज( Bhaiyyu Maharaj) यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केले होते. हे आरोप करणारी अभिनेत्री ही मल्लिका राजपूत होती. त्यामुळे नेमके मल्लिकाने भय्यू महाराजांवर काय आरोप केले होते. आणि संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. (mallika rajput suicide case bhaiyyu maharaj controversy big allegation)
नेमका आरोप काय?
अभिनेत्री मल्लिका राजपूतने त्यावेळी भय्यू महाराजांवर फसवणूकीचा आरोप केला होता. भय्यू महाराज वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून तिला त्रास द्यायचे, असाही दावा मल्लिका राजपूतने केला होता. भय्यू महाराजांवर आरोप केल्यानंतर मल्लिका राजपूत प्रचंड चर्चेत आली होती.
हे ही वाचा : Rajya Sabha 2024 : अजित पवारांचा चक्रावून टाकणारा निर्णय!
'भय्यू महाराज हे तांत्रिक आहेत. मी खूप मेहनत करून त्यांच्यावर पुस्तक लिहिले आहे. त्याच्याकडे अडीच वर्षांपासून पुस्तकाच्या 950 प्रती आहेत. त्यांनी मला गोंधळात टाकले आणि आता मला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करतात', असा आरोप मल्लिका राजपूतने त्यावेळेस भय्यू महाराजांवर केला होता.