Manoj Jarange : सरकारचा प्रस्ताव, जरांगे पाटलांची मोठी घोषणा
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा वाशी येथे आल्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका सविस्तरपणे मांडली.
ADVERTISEMENT

– देव कोटक, नवी मुंबई : “सरकारसोबत चर्चा झाली. आपण मागण्या केल्या होत्या. त्यासाठी आपण मुंबईपर्यंत आलोय. ५४ लाख नोंदी आढळल्या. ज्या नोंदी मिळाल्यात, त्या बांधवाच्या सगळ्या कुटुंबाला देखील प्रमाणपत्र देण्यात यावी”, अशी मागणी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी केली.
सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगेंची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी काही शासन आदेश आणि अधिसूचनेचे कागदपत्र देण्यात आली. ही कागदपत्रे घेऊन जरांगे पाटील यांनी समर्थकांशी संवाद साधला. वाशी येथील शिवाजी चौकामध्ये त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “ज्यांच्या नोंदी आढळून आल्या. त्यांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज करायला हवे. अर्ज केलाच नाही, तर प्रमाणपत्र मिळणार कसे. समजा भावाची नोंद आढळली, तर आपण अर्ज केला नाही, तर मग प्रमाणपत्र मिळणार कसे? आपण अर्ज करणे आवश्यक आहे”, असे जरांगे पाटील यांनी सांगितलं.










