Maratha Morcha : ‘…आता माघार घेणार नाही’, जरांगे पाटलांचा पुन्हा थेट इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला आता इशारा दिला आहे. शासनाने मराठा आरक्षणासाठी ठोस निर्णय घ्यावा अन्यथा 14 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी मेळावा घेऊन पुन्हा एकदा बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. यावेळी त्यांनी सरकारवरही आणि विरोधकांवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
Maratha Morcha : मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन पुकारणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Maratha Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा सरकार आणि विरोधकांनाही इशारा दिला आहे. शनिवारी अंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) शनिवारी मराठा समाजाची विचार मंथन बैठक घेण्यात आली. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकार (Maharashtra Government) आणि विरोधकांना ठणकावून सांगत सरकार आणि विरोधकांकडून मला कितीही दडपण आणले असले तरी आता मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) माघार घेणार नाही असा थेट इशाराच जरांगे पाटील यांनी दिला आहे. विचार मंथन (Vichar Manthan) बैठकीत त्यांनी सरकार आणि विरोधकांवर टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्याचा दौरा करणार असून त्या दौऱ्यानंतरच 14 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी मेळावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.(manoj jarange patil maratha morcha state wide meeting on october 14 maratha reservation)
ADVERTISEMENT
दडपण कितीही येऊ दे
अंतरवाली सराटीमध्ये शनिवारी मराठा आरक्षणासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी विचारमंथन बैठक घेण्यात आली. त्यावेळी जरांगे पाटील यांनी सांगितले की, आमच्या पाच पिढ्या आरक्षणाविना बरबाद झाल्या आहेत. त्यामुळे यापुढील पिढ्या बरबाद होऊ देणार नाही. सत्ताधारी आणि विरोधकांनी माझ्यावर कितीही दडपण आणले असले तरीही आता या आंदोलनातून माघार घेणार नाही असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
हे ही वाचा >> Nagpur Rain : पूरग्रस्त नागपुरकरांसाठी घोषणा! फडणवीस-गडकरींच्या बैठकीत काय झालं?
राज्यव्यापी मेळावा
मराठा समाजाला गेल्या पाच पिढ्यांपासून आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे शिक्षण आणि नोकरीमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. विचारमंथन बैठकीत जरांगे पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, 29 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरु असले तरी सरकारकडून अजूनही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्याचा दौरा करणार असून त्या दौऱ्यानंतरच 14 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी मेळावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे वाचलं का?
जोपर्यंत मी जिवंत..
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, आता मराठा समाजाच्या आंदोलनाला उचकवण्यासाठी कोण नागपूरला जाते आहे, तर कोणी कोल्हापूरला, कोणी पुण्याला जाऊन उचकून देत आहे. मात्र सरकार आणि विरोधकांकडे मला फोडण्यासाठी आता त्यांच्याकडे कोणतेही हत्यार नाही. त्यामुळे मी जिवंत असेपर्यंत त्यांचा डाव चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी विचार मंथन बैठकीत दिला आहे.
आम्ही समोरासमोर येणार नाही
मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरु आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही कोणताही वाद घालणार नाही आणि समोरासमोरही येणार नाही अशी स्पष्ट भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
ADVERTISEMENT
आरक्षणाची मागणी पूर्ण करावी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारुन सरकारबरोबर चर्चा केली. मात्र सरकारकडून ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी सांगितले की, शासनाने दिलेल्या मुदतीत आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, अन्यथा पुन्हा एकदा बेमुदत उपोषण केले जाईल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> अमित शाहांची मुंबईत एन्ट्री होताच सुप्रिया सुळेंचा थेट ‘वार’, म्हणाल्या…
उद्रेक नको
जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी बेमुदत उपोषण सुरु केले असले तरी त्यांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवसांपासून राज्यात कुठेही हिंसाचार नको, तसेच आंदोलन करायचे असेल तर शांततेत करा अशी विनंती ते गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. त्यामुळे त्यांनी विचार मंथन बैठकीवेळीही राज्यातील समाजबांधवांनी शांततेत आंदोलन करावे, कुठेही उद्रेक नको असं आवाहन करत शासनाने आरक्षणाची मागणी पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT