Cyclone: मिचॉन्ग चक्रीवादळाचा हैदोस; 5 जणांचा मृत्यू! महाराष्ट्रावरही सावट?
मिचॉन्ग चक्रीवादळ वेगाने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशकडे सरकत आहे. तामिळनाडूतील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहत आहेत.
ADVERTISEMENT
Michaung Cyclone Updates : मिचॉन्ग चक्रीवादळ (Michaung Cyclone) वेगाने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशकडे सरकत आहे. तामिळनाडूतील (Tamilnadu) अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहत आहेत. चेन्नईमध्ये (Chennai) एवढा मुसळधार पाऊस पडत आहे की, वाहने बोटीसारखी रस्त्यावर तरंगताना दिसत आहेत. आज म्हणजेच 5 डिसेंबरच्या दुपारपर्यंत मिचॉन्ग चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या (Andra Pradesh) किनारपट्टीवर धडकू शकते. वादळ येण्याआधीच पूर्व किनारपट्टीवरील 5 राज्ये अलर्ट मोडवर आहेत. हे वादळ नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यानच्या जमिनीवर धडकेल, त्यानंतर त्याचा वेग कमी होईल. (Michaung Cyclone terrible impact in Southern States of india 5 people dead in chennai What will be the effect on Maharashtra)
ADVERTISEMENT
आंध्र प्रदेशातील ‘या’ 8 जिल्ह्यांमध्ये अलर्ट
चेन्नईत मुसळधार पावसामुळे 12 फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याचीही बातमी आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना मदतीच्या उपाययोजना करण्यासाठी हाय अलर्टचे निर्देश दिले आहेत.
वाचा : पतीला झाडूने झोडलेलं? पत्नीबाबत Bombay High Court चा मोठा निर्णय
तीव्र चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने तिरुपती, नेल्लोर, प्रकाशम, बापटला, कृष्णा, पश्चिम गोदावरी, कोनासीमा आणि काकीनाडा या 8 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे चेन्नई विमानतळाच्या धावपट्टी आणि भुयारी मार्ग जलमय झाले आहेत. त्यामुळे विमानसेवा प्रभावित झाली आहे.
हे वाचलं का?
चक्रीवादळाच्या इशाऱ्याने एनडीआरएफ टीम अलर्ट मोडवर
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी देखील वादळासंदर्भात सतत बैठका घेत आहेत. ते म्हणाले की, ‘बापटला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थानिक लोकांच्या सुरक्षेसाठी आणि मदत कार्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. चक्रीवादळामुळे अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वाचा : Navy Day 2023: PM मोदींच्या सिंधुदुर्गाच्या किनारी मोठ्या घोषणा, आता शिवरायांची राजमुद्रा…
याशिवाय 24 तास समन्वय आणि परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षासह वैद्यकीय शिबिरेही उभारण्यात आली आहेत. त्याच वेळी, NDRF ने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पुद्दुचेरीसाठी 18 टीम तैनात केल्या आहेत. 10 अतिरिक्त पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.’
ADVERTISEMENT
मिचॉन्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्राला किती धोका?
मिचॉन्ग चक्रीवादळाने दक्षिण भारतात हैदोस घातलेला असताना महाराष्ट्रात याचा काय परिणाम होणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मिचॉन्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही. पण, राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
किनारी भागात कलम 144 लागू
वादळाचा इशारा पाहता किनारी भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. वादळामुळे उध्वस्त होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. मिचॉन्ग चक्रीवादळ तामिळनाडू, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या काळात 100 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वारे वाहू शकतात. पश्चिम बंगालच्या किनारी भागात या चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येईल. या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वाचा : Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 13 नागरिक जागीच ठार
मिचॉन्गची पश्चिम बंगालमध्येही हैदोस घालण्याची शक्यता?
3 डिसेंबर रोजी रात्री 11.30 वाजता चक्रीवादळ मिचॉन्ग चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकले, त्यानंतर 4 डिसेंबरच्या रात्रीपासून तामिळनाडूच्या 11 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. आता हे वादळ आज म्हणजेच 5 डिसेंबरला आंध्र प्रदेशात दाखल होणार आहे. तेथेही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे वादळ 6 डिसेंबरपर्यंत आंध्र प्रदेशात आपला प्रभाव दाखवेल. त्यानंतर, 7 डिसेंबर रोजी, मिचॉन्ग वादळ पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर, झारग्राम, परगणा, कोलकाता, हावडा आणि हुबळीसह अनेक जिल्ह्यांमध्ये हैदोस घालू शकते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT