Maharashtra Weather : महाराष्ट्रात आता नवं संकट, 'या' विभागाला थंडीचा तडाखा बसणार, हवामान खात्याचा अलर्ट
Maharashtra Weather : राज्याच्या सर्व भागांमध्ये - कोकण आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहिल असा अंदाज IMD विभागाने दर्शवला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्याच्या सर्व भागांमध्ये हवामान कोरडं
'या' विभागात थंडीचा तडाखा कायम
Maharashtra Weather : राज्याच्या सर्व भागांमध्ये - कोकण आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहिल असा अंदाज IMD विभागाने दर्शवला आहे. तसेच तापमानात मोठा बदल निर्माण अपेक्षित नाही. अशातच आता राज्यातील 5 डिसेंबर रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज कसा असेल याची माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.
हे ही वाचा : सोलापुरात प्रियकराने साथ सोडून लग्नाचा निर्णय घेतला, नैराश्यात गेलेल्या तृतीयपंथीयाने ओढणीने गळफास घेत आयुष्य संपवलं
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश होतो. सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तर मुंबईत तापमानात वाढ कायम राहणार आहे. तसेच येथील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्र विभागात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. या सर्वच जिल्ह्यात हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये तापमानात घट बघायला मिळत आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरडं वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरात आकाश निरभ्र राहणार आहे. तसेच येथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं.










