Saroj Ahire: आजारी बाळ, डोळ्यात अश्रू; आमदार अहिरे शिंदे-फडणवीसांवर भडकल्या
Saroj Ahire News : कडेवर तापाने फणफणलेलं बाळ, डोळ्यात अश्रू आणि मतदारसंघाला निधीच दिला जात नाही, हे सांगताना फुटलेला अश्रूंचा बांध… विधिमंडळ आवारात हे दृश्य बघून उपस्थितांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. शिंदे-फडणवीस सरकारकडून गेल्या आठ महिन्यांत एक रुपयाही दिला गेला नसल्याची व्यथा मांडताना आमदार सरोज अहिरे यांच्या अश्रूंचा बांध फुटला. हे सरकार फक्त शिंदे गट […]
ADVERTISEMENT
Saroj Ahire News : कडेवर तापाने फणफणलेलं बाळ, डोळ्यात अश्रू आणि मतदारसंघाला निधीच दिला जात नाही, हे सांगताना फुटलेला अश्रूंचा बांध… विधिमंडळ आवारात हे दृश्य बघून उपस्थितांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. शिंदे-फडणवीस सरकारकडून गेल्या आठ महिन्यांत एक रुपयाही दिला गेला नसल्याची व्यथा मांडताना आमदार सरोज अहिरे यांच्या अश्रूंचा बांध फुटला. हे सरकार फक्त शिंदे गट आणि फडणवीस, भाजपचं आहे का?, असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ADVERTISEMENT
नाशिकमधील देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे हिवाळी अधिवेशनात बाळा घेऊन पोहोचल्या होत्या. त्यावेळी विधिमंडळ परिसरात हिरकणी कक्षाचं उद्घाटन केलं गेलं. पण, त्याचं सरोज अहिरेंना मुंबईत वेगळा अनुभव आला.
सरोज अहिरे यांचं पाच महिन्याचं बाळ आजारी आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यानं त्या आजारी बाळासह मुंबईत आल्या. विधिमंडळ परिसरात हिरकणी कक्षच नसल्यानं त्यांना राज्यपालांचं अभिभाषणही ऐकता आलं नाही. त्यानंतर त्यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांसमोर व्यथा मांडली.
हे वाचलं का?
Saroj Ahire: विधानसभेतील हिरकणी, चिमुकल्यासह आमदार थेट विधिमंडळात!
सरोज अहिरे म्हणाल्या, “मी बाळाला डॉक्टरकडे घेऊन गेले होते. त्याला अजूनही ताप आहे. अशा परिस्थिती मी माझ्या बाळाला घेऊन, रिस्क घेऊन मी माझ्या जनतेचे प्रश्न इथे मांडत आहे. सरकारने अशी व्यवस्था केली असती तर (बाळाला ठेवण्यासाठी स्वच्छ हिरकणी कक्ष)… आज मला दुःख याचं होतंय की, तो आजारी यांचं आई म्हणून दुःख आहे”, असं त्या म्हणाल्या.
ADVERTISEMENT
…तर मला अधिवेशन सोडून जावं लागेल, सरोज अहिरेंना अश्रू अनावर
सरोज अहिरे पुढे बोलताना म्हणाल्या की, “दुसरं दुःख हे होत आहे की, मी माझ्या मतदारसंघाला न्याय मागण्यासाठी इथे आले आहे. बजेटमध्ये काही तरतूदी करण्यासाठी इथे आले होते. परंतु आज व्यवस्था झाली नाही, तर मला हे अधिवेशन सोडून पुन्हा जावं लागेल. माझ्या मतदारसंघासाठी काय मला नेता येईल किंवा हे सरकार काय देईल हे मला माहिती नाही.”
ADVERTISEMENT
Maharashtra budget Session: नार्वेकरांची चूक, आदित्य ठाकरेंनी आणून दिली लक्षात
…अन् आमदार अहिरे 5 महिन्याच्या बाळाला खांद्यावर घेऊन विधानभवनात रडल्या@NCPspeaks #sarojahire #assemblysession pic.twitter.com/0A08cNzWmS
— Mumbai Tak (@mumbaitak) February 27, 2023
हे सरकार फक्त शिंदे गट आणि फडणवीस, भाजपचं असेल, तर…; सरोज अहिरेंचा सरकारवर संताप
निधी दिला जात नसल्याची खंत सरोज अहिरे यांनी व्यक्त केली. निधीबद्दल होत असलेल्या अन्यायाबद्दल बोलताना आमदार अहिरे म्हणाल्या, “तसंही राज्यपालांचं अभिभाषण झालेलं आहे. मी ते ऐकू शकले नाही, कारण मी बाळाला घेऊन तिथे जाऊ शकले नाही. परिस्थितीमुळे मला त्याला एकटं सोडून जाता आलं नाही. त्यांच्या अभिभाषणात एक उल्लेख असतो की, माझा महाराष्ट्र, माझं सरकार… पण हे सरकार फक्त शिंदे गट आणि फडणवीस, भाजपचं असेल, तर मला वाटतं की, गेल्या 8 महिन्यांमध्ये रुपयाचाही निधी माझ्या मतदारसंघाला मिळालेला नाहीये. सगळ्या खुन्नस बाजूला ठेवून जनतेचे प्रश्न… कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याचे असतात”, अशा शब्दात सरोज अहिरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारबद्दलचा संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT