Maharashtra Weather: उशिरा आला पण वेगानं पुढे सरकला, कोकणात तर आला पण...
Monsoon Update 2026: महाराष्ट्रात मान्सूनची आगेकूच सुरू झाली आहे. दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून 10 ते 15 जूनदरम्यान संपूर्ण राज्यात मान्सून व्यापण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रात आणखी प्रगती केली असून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, 8 जून रोजी मान्सूनने दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये पुढे सरकण्याची नोंद झाली आहे.
मान्सूनचे आगमन गोवा आणि कोकणातील काही भागांपुरते मर्यादित राहिल्यानंतर तो पुढे कधी सरकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता मान्सूनने वेग घेतल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मान्सून सध्या कुठपर्यंत पोहोचला?
हवामान विभागाच्या ताज्या नोंदीनुसार, दक्षिण कोकणातील मोठा भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच शेजारील राज्यांतील अनेक भाग मान्सूनच्या प्रभावाखाली आले आहेत. मान्सूनच्या प्रगतीचा नकाशा पाहिल्यास कोकण किनारपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्रात त्याची सक्रियता स्पष्टपणे दिसून येत आहे. यामुळेच या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Weather : राज्यात तुफानी पावसाची शक्यता, 26 जिल्ह्यांना मोठा अलर्ट
मान्सूनला पुढे सरकण्यासाठी काय मदत झाली?
हवामान तज्ज्ञांच्या मते, महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या (Cyclonic Circulation) प्रणालीमुळे मान्सूनला पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण मिळाले आहे.









