Monsoon Update: अरेरे.. मान्सून अचानक का मंदावला? बंगालच्या उपसागरात जे हवं तेच नाही घडलं!
Maharashtra Monsoon Update: मान्सून 2026 बाबत अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट! केरळमध्ये उशिरा दाखल झाल्यानंतर आता मान्सूनचा वेग काहीसा मंदावला असल्याचं बोललं जात आहे. जाणून घ्या बंगालच्या उपसागरात नेमकं काय घडतंय?
ADVERTISEMENT

मुंबई: देशभरात मान्सूनच्या प्रगतीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भारतीय हवामान विभाग (IMD) आणि खासगी हवामान संस्था स्कायमेट वेदर यांच्या अंदाजांमध्ये काहीसा फरक दिसून येत आहे. सध्या मान्सूनने ईशान्य भारत, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागांपर्यंत प्रगती केली असून महाराष्ट्रातील कोकण आणि दक्षिण भागातही त्याने हजेरी लावली आहे. मात्र, पुढील वाटचाल अपेक्षेपेक्षा काहीशी मंदावू शकते, असा अंदाज स्कायमेट वेदरने व्यक्त केला आहे.
मान्सून नेमका कुठपर्यंत पोहोचला?
IMD च्या माहितीनुसार 6 जूनपर्यंत नैऋत्य मान्सूनने ईशान्य भारतातील सर्व राज्ये, संपूर्ण सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागांना व्यापले आहे.
महाराष्ट्रात पाहिल्यास सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण कोकण किनारपट्टी मान्सूनच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हे ही वाचा>> बीड: अधिक मासात जावयाला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, पुढं काय घडलं?
तसेच 10 ते 20 जूनदरम्यान मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकतो, असा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.









