Monsoon Update : राज्यभरात पावसाचा हाहाकार! दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला, तर 'या' ठिकाणी ढगफुटी सदृश्यस्थिती

मुंबई तक

Monsoon Update : राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे दोन जिल्ह्यांचा संपर्क देखील तुटला आहे. तर पुणे जिल्ह्यात ढगफुटी सदृश्यस्थिती आहे.

ADVERTISEMENT

Monsoon Update Heavy rains across the Maharashtra state
Monsoon Update Heavy rains across the Maharashtra state
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातले आहे.

point

हवामान अभ्यासकांनी 25 मे रोजी राज्यात पाऊस दाखल झाल्याचं सांगितलं असता, पावसाने झोडपलं

Monsoon Update : राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा तसेच पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. पुणे जिल्हातील काही भागांत पाणी साचलं असून दौड तालुक्यातील कुरकंभ येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांना ट्राफिकचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे पुणे -सोलापूर महामार्गावरील पाटस येथे ढगफुटी सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. याच परिस्थितीमुळे शेतीचे नुकसान झालेलं आहे. तसेच बीड आणि संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांमधील संपर्क तुटला आहे. तर सिन्नर बस स्थानकाचा स्लॅब शिवशाही बसवर कोसळला आहे. 

हेही वाचा : Mansoon update : 12 दिवसांआधीच राज्यात मान्सून दाखल, मुंबई-पुण्यात काही तासांतच धडकणार

साताऱ्यात पावसाचा हाहाकार

साताऱ्यात पावसाने थैमान घातलं आहे. फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे धुमाळवाडी गावाचा एकूण 35 गावांशी संपर्क तुटला आहे. फळांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडीवर मुसळधार पावसाचे संकट ओढावले आहे. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यात पाऊस थांबायचं नाव घेत नाही. यामुळे कोयना धरणातील पाणी हे ओव्हफ्लो झाले आहे. 

पुणे जिल्ह्यात ढगसदृश्यस्थिती 

साताऱ्यानंतर पुणे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दौंड तालुक्यातील पाटसमध्ये ढगफुटी सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. तर कुरकुंभमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना ट्राफिकचा सामना करावा लागत आहे. तसेच या पावसामुळे काही छोटे पूल हे पाण्याखाली गेले आहेत. तसेच वाहत्या पाण्यामध्ये एक कार वाहून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

पालघरमध्येही पावसाचं थैमान

पालघरमध्ये मध्यरात्रीपासून पाऊस थांबायचं नाव घेत नाही. आज दिवसभर पावसाने पालघर जिल्ह्यामध्ये दमदार बॅटिंग केली आहे. यामुळे पालघरमध्ये काढणीसाठी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पालघर जिल्ह्यात सर्वाधिक वीट भट्टींचे प्रमाण आहे. मात्र, या मान्सूनने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पळवला आहे. त्यामुळे केवळ पालघरच नाहीतर राज्यातील बळीराजा सध्या चिंतेत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp