मुंबई गुदमरतेय! हवेची गुणवत्ता खालवली, BMC ने घेतला मोठा निर्णय

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Mumbai weather : देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. मात्र आता या मुंबईची मात्र प्रदूषणाबाबत वाताहात सुरू आहे. मुंबईत प्रदूषणाची पातळी (Pollution level) सातत्याने वाढत असल्याने आता अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. आज 24 ऑक्टोबर रोजी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा आकडा 163 एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) वर पोहोचला आहे. त्यामुळे त्याचा लोकांच्या आरोग्यावरही (Health) मोठा परिणाम होत आहे. हवा प्रदूषित झाल्यामुळे खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनच्या (Cough and viral infections) तक्रारी प्रचंड वाढल्या आहेत. (mumbai air Air Quality Index pollution reaches to 163 weather bmc new guidelines released)

मुंबईत पर्यावरणाची हानी

मुंबईतील प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाहतूक हे आहे. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते महानगरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे प्रदूषणाची पातळीही प्रचंड वाढत आहे. कायम स्वरुपी होणाऱ्या बांधकामामुळे धूळ आणि मातीचेही मोठ्या प्रमाणात विपरित परिणाम होतो आहे. या गोष्टींमुळेच मुंबईतील पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.

हे ही वाचा >> मुंबईच्या दसरा मेळाव्यास जाणाऱ्या वाहनाला टँकरची धडक, शिवसैनिकाचा जागीच मृत्यू

बीएमसीच्या सूचना

मुंबईतील हवा प्रदूषित होत असल्याने त्याबाबत आता मुंबई महानगरपालिका अत्यंत गंभीर विचार करत आहे. मुंबईतील धुरळा कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून अँटी स्मॉग गन आणि वॉटर स्प्रिंकलरच्या मदतीने प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी बीएमसीकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. याबाबत बीएमसीकडून बांधकामाच्या ठिकाणी 35 फूट उंच लोखंडी पत्र्याचे आवरण बंधनकारक करण्यात आले आहे. तर एक एकरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या बांधकामाच्या जागेसाठी लोखंडी पत्र्याचे कुंपण 25 फूट उंच असावे अशी सुचनाही देण्यात आल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अँटी स्मॉग गन

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला हिरवे कापड म्हणजेच ताडपत्र लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवा प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबईतील 50 ते 60 प्रमुख मार्गावर अँटी स्मॉग गन चालवणार जाणार आहे. त्याचबरोबर रिफायनरीज, पॉवर प्लांट आणि आरसीएफमुळे होणारे प्रदूषणाची पातळी किती आहे तेही या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे.

वाहनांवर ताडफत्री टाकण्याच्या सूचना

शहरातून बांधकामाचे भंगार वाहून घेऊन जाणाऱ्या वाहनांवर ताडपत्रीने झाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही वाहनाला वजनापेक्षा जास्त वजनाची वाहतूक करण्याची परवानगी नाकारली गेली आहे. तसेच सर्व वाहनांचे टायर बांधकामाच्या ठिकाण सोडण्यापूर्वी आणि रस्त्यावर जाण्यापूर्वी धूळ काढण्यासाठी ते स्वच्छ करण्याची गरज असल्याचेही प्रशासनाकडून सागंण्यात आले आहे. तसेच धूळ आणि चिखल लागलेल्या टायरवरही पाणी शिंपडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच दिवसभराच्या कामानंतर ही सर्व वाहनं स्वच्छ करावी असंही सांगण्यात आली आहेत. त्याच बरोबर सर्व बांधकाम ठिकाणांवर सीसीटीव्ही बसवणयासही सांगण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Uddhav Thackeray Dasara Melava 2023: उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू, तोफ धडाडणार

वाहनांची परवानगी रद्द

मुंबईतील रस्ते आणि पदपथांवर कचरा टाकणाऱ्या वाहनांकडून मोठा दंड वसूल करण्यासही सांगितले आहे. तसेच कचरा टाकण्याचा परवानगी असली तरी कोणत्याही ठिकाणी कचरा टाकला जात असेल तर अशा वाहनांची परवानगी रद्द करण्यात येईल अशी सूचना दिली गेली आहे.

ADVERTISEMENT

निरीक्षणासाठी तज्ञांचीही नियुक्ती

मुंबईतील हवेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्यामुळे आता एमपीसीबी आणि बीएमसी रिफायनरीज, टाटा पॉवर प्लांट आणि आरसीएफमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या पातळीची तपासणी आणि निरीक्षण करण्यासाठी तज्ञांचीही नियुक्ती केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हे ही वाचा >>Eknath Shinde Dasara Melava 2023: आझाद मैदानावर दसरा मेळावा, CM शिंदेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष

    follow whatsapp

    ADVERTISEMENT