Gautam Adani : 'धारावी'नंतर 'ही' जागा अदानी खरेदी करणार?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbai msrdc build tower at bandra reclamation gautam adani larsent and turbo tender
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मोक्याच्या ठिकाणी 24 एकरवर पसरलेल्या वांद्रे रिक्लेमेशन (Bandra Recalamation) जागेचा विकास करण्याचा निर्णय घेतला होता.
social share
google news

Bandra Recalamation, Gautam Adani :  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने  (MSRDC) मोक्याच्या ठिकाणी 24 एकरवर पसरलेल्या वांद्रे रिक्लेमेशन (Bandra Recalamation) जागेचा विकास करण्याचा निर्णय घेतला होता. या जागेच्या विकासासाठी अनेक निविदा मागवण्यात आल्या होत्या. यामधील अदानी (Adani Realty), एल अँड टी आणि मायफेअर अशा तीन निविदा अंतिम झाल्या आहेत. या निविदांची छाननी करून लवकरात लवकर निविदा अंतिम करण्याचे उद्दीष्ट आहे. अशात आता हा भुखंड अदानींच्या पारड्यात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे धारावी नंतर वांद्रे रिक्लेमेशन अदानी खरेदी करणार असल्याची चर्चा सूरू झाली आहे.( mumbai msrdc build tower at bandra reclamation gautam adani larsent and turbo tender) 
 
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने  (MSRDC) मोक्याच्या ठिकाणच्या 24 एकर जागेवर उत्तुंग इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त भागिदारी प्रकल्पाअंतर्गत या जागेचा विकासासाठी बुधवारी ऑनलाईन ऑक्शन पार पडले होते. या ऑक्शनला अनेक दिग्गज कंपन्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये गोदरेज प्रॉपर्टीज, अदानी रिअॅलिटी, सनटेक रिअॅलिटी, के रहेजा कॉर्प, एल अँड टी रिअॅलिटी, वाधवा ग्रुप, रुणवाल, ओबेरॉय रिअॅलिटी, लोढा, सटवा आदींनी भाग घेतला होता. 

हे ही वाचा : Devendra Fadnavis : अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर? फडणवीस म्हणाले, 'मला विश्वास...'

आता या कंपन्यांपैकी केवळ तिघांनीच निविदा प्रक्रियेला प्रतिसाद दिला आहे. अदानी,  एल अँड टी आणि मायफेअर अशी या कंपनींची नावे आहेत. त्यात अदानी आणि एल अँड टी या दोन कंपन्या ही जागा खरेदी करण्यात प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. तसेच तांत्रिक क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी बोली आता मालमत्ता सल्लागार JLL यांच्याकडे सोपवण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेला कदाचित एक आठवडा लागेल, असे MSRDC चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक कैलाश जाधव यांनी सांगितले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत तीनही बोली उघडल्या जातील आणि विजेत्या बोलीदाराला विकास हक्क "लवकरच" दिले जातील.  MSRDC च्या बोली दस्तऐवजातील पात्रता निकष इतके कठोर आहेत की अनेक विकासकांनी खाजगीत तक्रार केली आहे. बहुतेक विकासक अपात्र होतील. तांत्रिक पात्रता निकषांमध्ये असे म्हटले आहे की बोलीदार केवळ एकच संस्था असणे आवश्यक आहे आणि एक संघ, संयुक्त उपक्रम, सहयोग किंवा व्यक्तींची संघटना नाही. निविदा दस्तऐवजातील सर्वात आव्हानात्मक अट अशी होती की 31 मार्च 2023 रोजी बोलीदाराची किमान एकत्रित निव्वळ संपत्ती 15,000 कोटी रुपयांपेक्षा कमी नसावी. "ही एक अट आहे जी बहुतेक मोठे विकासक संयुक्त उपक्रमात असल्याशिवाय पूर्ण करू शकत नाही किंवा दुसऱ्या मोठ्या कंपनीशी सहकार्याशिवाय शक्य नाही. 

हे ही वाचा : Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

ADVERTISEMENT

नेमका प्रोजेक्ट काय बनणार? 

ADVERTISEMENT


"वांद्रे जमिनीच्या विकासामुळे 45 लाख चौरस फूट विकास क्षमता असलेली एक मिनी-टाउनशिप तयार होईल. अटी कडक आहेत कारण विकासकाला पुढील नऊ ते 14 वर्षांत MSRDC ला 8,000 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी माहिती आहे. 

दरम्यान आता वांद्रे रेक्लेमेशन अदानीच खरेदी करतील अशी चर्चा सूरू आहे. त्यामुळे आता धारावीनंतर आता वांद्रे रेक्लेमेशन अदानींच्या पारड्यात जातंय का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT