Mumbai : कर्तव्य बजावून घरी परतताना काळाचा घाला, पोलीस शिपायाचा मांजाने चिरला गळा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbai news dindoshi police constable throat was cut with kite strike worli shocking story
mumbai news dindoshi police constable throat was cut with kite strike worli shocking story
social share
google news

Mumbai Accident News : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका पोलीस शिपायाचा (Police Constable) कर्तव्य बजावून दुचाकीवरून घरी परतत असताना पतंगाच्या (Kite) मांजाने गळा कापल्याची घटना घडली आहे. या घटनेत पोलीस शिपायाचा जागीच मृत्यू झाला आहे. समीर जाधव (वय 37) असे या मृत पोलीस शिपायाचे नाव आहे. पश्चिम दृतगती महामार्गावरील वाकोला पूलावर ही घटना घडली होती. दरम्यान जाधव हे वरळीच्या बीडीडी चाळीत वास्तव्यास होते. (worli BDD Chawl)  त्यामुळे आता वरळीसह मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. (mumbai news dindoshi police constable throat was cut with kite strike worli shocking story)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई समीर जाधव कर्तव्यावर होते. घटनेच्या दिवशी कर्तव्य बजावून समीर जाधव दुचाकीवरून वरळीला त्यांच्या घरी निघाले होते. या दरम्यान दुचाकीने घरी जात असताना वाटेतच त्यांच्या गळ्याभोवती मांजा आला. या मांजाने त्यांचा गळाच चिरला गेला. पश्चिम दृतगती महामार्गावरील वाकोला पूलावर ही घटना घडली होती.

हे ही वाचा : अजितदादांचा थेट पवारांवर हल्ला! ‘काहींनी 38 व्या वर्षी वसंतदादांना बाजूला सारलं अन् मी 60 व्या…’

मांजाने गळा चिरल्यानंतर समीर जाधव महामार्गावर कोसळले होते. त्यानंतर तत्काळ अॅम्ब्युलन्स मागवून सायन रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले होते. यानंतर खेरवाडी पोलिसांनी रूग्णालय गाठत जाधव यांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली होती. या घटनेने जाधव यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता.दरम्यान खेरवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरु केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Uddhav Thackeray : “…तर अजित पवार कोणत्याच चिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत”

मुंबईत गँगवार! अंदाधुंद गोळीबारात एक ठार तीन जखमी

मुंबईतील चुनाभट्टी येथील आझाद गल्लीमध्ये दिवसाढवळ्या 16 वेळा गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. या गोळीबारामध्ये एक जण ठार झाला असून तिघं जण गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या गोळीबारच्या घटनेमुळे मुंबईतील गँगवॉरने (Gangwar) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे का असा सवालही आता उपस्थित होऊ लागला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून 16 वेळा गोळीबार (Firing) करण्यात आला असून त्यामध्ये सुमित येरुणकरचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT