Belapur Train Accident : लोकल पकडायला गेली अन् दोन्ही पाय..., नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना

मुंबई तक

Mumbai Local Train Accident : मुंबईत सकाळी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानकात नोकरदारांची प्रचंड गर्दी जमली होती. लोकल सेवा उशिराने सुरू असल्याने ही गर्दी वाढतच होती.या गर्दी दरम्यानच बेळापूर रेल्वेस्थानकात अपघाताची घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

गर्दी दरम्यान एक महिला रुळावर कोसळल्याची घटना घडली आहे.
mumbai rain news navi mumbai belapur train accident women slipped and fell on the track local train runs over her loses both legs
social share
google news

Mumbai Local Train Accident : मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडतोय. या पावसामुळे रेल्वे स्थानकात (Belapur Railway Station) प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे. या गर्दी दरम्यान एक महिला रुळावर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला (Women Accident) फक्त रुळावरच पडली नाही, तर तिच्या अंगावरून ट्रेन देखील गेली आहे. या अपघातात सुदैवाने महिलेचा जीव वाचला आहे, पण तिला पाय गमावावे लागले आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.  (mumbai rain news navi mumbai belapur train accident women slipped and fell on the track local train runs over her loses both legs)  

मुंबईत सकाळी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानकात नोकरदारांची प्रचंड गर्दी जमली होती. लोकल सेवा उशिराने सुरू असल्याने ही गर्दी वाढतच होती.या गर्दी दरम्यानच बेळापूर रेल्वेस्थानकात अपघाताची घटना घडली आहे. 

पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्थानकावर येत होती. यावेळी लोकल पकडण्याच्या नादात एक महिला पाय घसरून थेट रुळावर कोसळळी होती. याच दरम्यान ट्रेन सुटल्याने तिच्या अंगावरून महिलेचा पहिला डब्बा गेला. 

हे ही वाचा : Pune Hit and Run : पुणे हादरले! इनोव्हा उडवले, पोलिसाचा जागीच मृत्यू

या दरम्यान काही प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत ट्रेनची इमरजंन्सी चैन खेचली होती. ज्यामुळे लगेचच मोटरमनने ट्रेन थांबवण्यात आली होती. यावेळी महिलेचा जीव वाचावा या दृष्टीने ट्रेन पुन्हा पुन्हा मागे घेण्यात आली होती. यादरम्यान सुदैवाने या अपघातातून महिला बचावली होती. मात्र तिला दोन्ही पाय गमवावे लागले होते. या घटनेनंतर महिलेला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp