Mumbai Today Weather Update: आरारारा! मुंबईत कडाक्याची थंडी, 8 वर्षानंतर पहिल्यांदाच हुडहुडी वाढली, कारण...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbai Whether Update Today
Mumbai Whether Update Today
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत कडाक्याच्या थंडीमुळं हुडहुडी वाढली

point

मुंबईत आजचं तापमान काय?

point

8 वर्षानंतर सर्वात कमी तापमानाची नोंद

Mumbai Weather Today: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. सोमवारी रात्री मुंबईचं किमान तापमान 16.9 डिग्री सेल्सियसपर्यंत घटलं. मुंबईत 8 वर्षानंतर नोव्हेंबर महिन्यात सर्वात कमी तापमनाची नोंद झालीय. याआधी 11 नोव्हेंबर 2016 मध्ये मुंबईचं तापमान 16.3 डिग्री सेल्सियसवर पोहोचलं होतं. 29 नोव्हेंबरला तापमानात घट होऊन 14 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

ADVERTISEMENT

मुंबईत सायंकाळ झाल्यावर तापमानात घट होण्यास सुरुवात होते आणि थंडीची चाहूल सुरु होते. सोमवारी मुंबईत गुलाबी थंडी पडली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईचं किमान तापमान 19 डिग्री सेल्सियस होतं. परंतु, पुढच्या दिवशी 24 तासातच किमान तापमानात घट होऊन 16.9 डिग्री सेल्सियसवर पोहोचलं. किमान तापमानात सामान्यपणे 3.8 डिग्री सेल्यियसने कमी झालं. तर कमाल तापमानात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं नाही.

हे ही वाचा >> EVM: 12 आमदारांना सारखीच मतं कशी मिळाली? रोहित पवारांनी यादीच दाखवली!

...म्हणून तापमानात झाला बदल

मंगळवारी कमाल तापमान 33.6 डिग्री सेल्सियस इतकं नोंदवण्यात आलं होतं. तर 29 नोव्हेंबरपर्यंत किमान तापमानात घट होऊन ते 16 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचू शकतं, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. परंतु, उत्तर भारतातून पसरलेल्या थंड हवेमुळं सोमवारी तापमानात 2 डिग्री सेल्सियसपर्यंत घट झाली. सध्या तापमान 16 ते 18 डिग्री सेल्सियसपर्यंत राहू शकतं. पण 29 नोव्हेंबरला यामध्ये आणखी 2 डिग्री सेल्सियने घट होऊ शकते. त्यामुळे या महिन्याच्या अखेपर्यंत मुंबईकरांना हुडहुडी जाणवू शकते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Kalyan: हायप्रोफाईल सोसायटीत भीषण आग, तीन मजले जळून खाक अन्...

तापमानात आणखी होऊ शकते घट

खूप वर्षानंतर नोव्हेंबर महिन्यात तापमानात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी उत्तर विभागात जेव्हढा बर्फ वितळेल, त्यानुसार तापमानात घट होऊन थंडी वाढू शकते. उत्तर भारतातून मुंबईच्या दिशेनं आलेली हवा तापमानात आणखी घट करू शकते. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT