नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसेंच्या कारचा दिल्लीत भीषण अपघात

मुंबई तक

ADVERTISEMENT

हेमंत गोडसेंच्या कारला अपघात
हेमंत गोडसेंच्या कारला अपघात
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नाशिकचे खासदार गोडसेंच्या कारला अपघात

point

दिल्लीत कारला भीषण अपघात

point

सुदैवाने हेमंत गोडसेंना कोणतीही दुखापत

Hemant Godse Car Accident: नवी दिल्ली: नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात झाल्याचं वृत्त हाती येत आहे. सुदैवाने हेमंत गोडसे हे या अपघातातून बचावले आहेत. मात्र, त्यांच्या कारचं प्रचंड नुकसान झालं आहे. दिल्लीतील बी.डी. मार्ग या रस्त्यावर त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. (nashik shiv sena mp hemant godse car met with a horrific accident in delhi)

ADVERTISEMENT

राजधानी दिल्लीत शिवजंयतीचा कार्यक्रम हा आयोजित केला जातो. संसद परिसरात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तेथील कार्यक्रमासाठी हेमंत गोडसे हे दिल्लीत आले होते. आज (19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून परतत असतानाच त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.

कार्यक्रम संपवून हेमंत गोडसे हे त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी परतत असताना हा अपघात झाला. एका कारला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या एका दुसऱ्या वाहानाने त्यांच्या कारला जोरदार धडक मारली. ज्यामध्ये गोडसेंच्या कारचं प्रचंड नुकसान झालं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Palghar : वैतरणा खाडीत तरूणावर शार्कचा हल्ला, पायाचा तोडला लचका

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. या अपघातानंतर हेमंत गोडसे हे दुसऱ्या कारने त्यांच्या दिल्लीतील घरी परतले. जिथे त्यांनी काही काळ विश्रांती घेतली. त्यानंतर काही वेळाने ते दिल्ली विमानतळावर पोहचले. आणि तिथून त्यांनी थेट शिर्डी विमानतळ गाठलं.

नाशिक मतदारसंघात विक्रम रचणारे हेमंत गोडसे

हेमंत गोडसे हे शिवसेना (शिंदे गट) यांचे विद्यमान खासदार आहेत. ते सलग दुसऱ्यांदा नाशिक मतदारसंघातून खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले आहे. जो एक मोठा विक्रम आहे. तब्बल 42 वर्षांपासून एका खासदाराला दुसऱ्यांदा संधी न देण्याची पंरपरा असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात हेमंत गोडसेंनी सलग दुसऱ्यांदा निवडून येत मोठा इतिहास रचला.

ADVERTISEMENT

सन 2009 मध्ये या मतदारसंघात तिरंगी लढत होऊन त्याचा फायदा थेट ‘राष्ट्रवादी’चे समीर भुजबळ झालेला. त्यावेळी ते 22 हजार मतांनी निवडून आलेले. पण 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत हेमंत गोडसेंनी छगन भुजबळांसारख्या तालेवार नेत्याचा दणदणीत पराभव केलेला. 

ADVERTISEMENT

याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी 2019 मध्ये भुजबळ काका-पुतण्यानी नाशिक लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकद पणाला लावलेली. मात्र, शिवसेना आणि भाजपने 2014 ते 2019 या पाच वर्षांत मतदारसंघात जोमाने प्रचार करत आपली ताकद निर्माण केलेली ज्याचा फायदा हा हेमंत गोडसेंना झाला. शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना झाला आणि त्यांनी तब्बल 42 वर्षांनी या मतदारसंघात इतिहास रचला.

हे ही वाचा>> Mumbai Airport : व्हीलचेअरमुळे 80 वर्षाच्या प्रवाशाचा मृत्यू; विमानतळावर घडली दुर्दैवी घटना

खासदार हेमंत गोडसे यांनी 2019 लोकसभा निवडणुकीत 5 लाख 63 हजार 599 मते मिळवली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना 2 लाख 71 हजार 395 मते मिळाली होती. याशिवाय अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांना 1 लाख 34 हजार 527 तर वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांना तब्बल 1 लाख 09 हजार 981 मते मिळालेली.

शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे आता सलग तिसर्‍यांदा निवडून येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT