'नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो', प्रत्येकाने ऐकावी अशी सलील कुलकर्णींची कविता; खडबडून जागे व्हाल!
सलील कुलकर्णी यांची ‘नवीन डेटा पॅक दे रे’ही कविता सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या कवितेच्या माध्यामतून त्यांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंग करणाऱ्यांवर उपहासात्मक भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT

पुणे: मराठी संगीत आणि साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध नाव, गायक-संगीतकार सलील कुलकर्णी यांनी नुकताच एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ‘नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो’ या कवितेच्या माध्यमातून सलील यांनी सोशल मीडिया ट्रोलिंगच्या वाढत्या समस्येवर उपहासात्मक भाष्य केलं आहे.
ही कविता आणि त्याचा व्हिडिओ सध्याच्या डिजिटल युगातील निनावी टीकाकार आणि त्यांच्या वर्तनावर प्रकाश टाकणारा आहे. या व्हिडिओला मराठी प्रेक्षक आणि कलाकारांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी याला सामाजिक जागरूकतेचा एक प्रभावी प्रयत्न मानले आहे.
कवितेची पार्श्वभूमी
सलील कुलकर्णी यांनी ही कविता सोशल मीडियावर शेअर केली असून, त्यात आजच्या सोशल मीडिया संस्कृतीतील नकारात्मकता आणि निनावी अकाउंटमधून होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला आहे. कवितेच्या ओळी, “नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो, रोज वेगळं नाव लावून, लपून लपून भुंकीन म्हणतो,” या थेट आणि उपरोधिक शैलीत ट्रोलर्सच्या मानसिकतेचे चित्र रेखाटलं आहे. सलील यांनी या कवितेतून प्रश्न उपस्थित केला आहे की, इतरांना लक्ष्य करणारी माणसे कोठून येतात आणि त्यांच्या मनात असा द्वेष कसा निर्माण होतो?
सलील कुलकर्णींची 'नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो..', जशीच्या तशी
नवीन डेटा पॅक दे रे
नवीन डेटा पॅक दे रे
आभाळावर थुंकीन म्हणतो










