Kasba Peth Bypoll : ‘ईव्हीएम’चा फोटो केला शेअर! रुपाली ठोंबरेंवर कारवाई होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Kasba Peth by election 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरेंनी पुन्हा एक वाद ओढवून घेतला आहे. कसबा पेठ मतदारसंघात मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी गेलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मतदान करतानाचा ईव्हीएमचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.

कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत मतदान होतंय. कसब्यात रवींद्र धंगेकर, हेमंत रासने आणि आनंद दवे यांच्यात लढत होत आहे. पण, याच मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्याकडून निवडणूक आचार संहितेचा भंग झाला आहे.

रुपाली ठोंबरे पाटील यांनी कसबा मतदारसंघात मतदान करण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. त्यांनी शेअर केलेल्या फोटोत मतदार मतदान करत असून, कोणत्या उमेदवाराला मत दिले, हे त्यात स्पष्ट दिसत आहे. ईव्हीएमवरील कोणतं बटन दाबलं, हे त्यांच्या फोटोत स्पष्ट दिसत आहे. हाच फोटो रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

chinchwad-kasba Peth bypolls Live : चिंचवडमध्ये 3.52 टक्के, कसब्यात 6.5 टक्के मतदान

मतदान हे गोपनीय असतं आणि आचारसंहिताही लागू आहे, पण रुपाली ठोंबरेंनी थेट फोटोच शेअर केलाय. असं करून त्यांनी गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचं समोर आलंय. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर कोणती कारवाई होणार हे महत्त्वाचं.

ADVERTISEMENT

लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 130 नुसार मतदान हे गोपनीय असतं. मतदाराला त्याने कुणाला मतदान केलं, याबद्दल गुप्तता बाळगावी लागते. जर मतदाराकडून गोपनीयतेचा भंग झाला, तर त्याच्यावर लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 130 नुसार कारवाई होते.

ADVERTISEMENT

kasba Peth: हेमंत रासने की रवींद्र धंगेकर, पाच फॅक्टर ठरवणार कोण जिंकणार?

कसबा पेठ मतदारसंघात रविवारी (26 फेब्रुवारी) 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. या मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासने हे निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने हेमंत रासने यांच्याविरुद्ध रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ब्राह्मण महासंघाचे आनंद दवेही येथून निवडणूक लढत आहेत.

हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होत असून, भाजप नेतृत्वाखालील महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचारात प्रतिष्ठा पणाला लावल्याचं दिसलं. कसबा पेठ हा मतदारसंघ भाजपकडे होता. मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यामुळे मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून, भाजपला मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यात यश मिळणार की, रवींद्र धंगेकर जायंट किलर ठरणार, यामुळेच ही निवडणूक चर्चेत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT