पुण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आप्पा जाधव यांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण, व्हीडिओ व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातील भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याची घटना १४ मे रोजी घडली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आप्पा जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंबेकर यांना जाब विचारला. पण त्यावेळी आप्पा जाधव यांनी आंबेकर यांच्या कानाखाली मारल्याची घटना घडली होती.

ADVERTISEMENT

या घटनेनंतर आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आप्पा जाधव यांच्या ऑफिसमध्ये घुसून मारहाण केलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

हे वाचलं का?

अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर केली होती.त्यानंतर पुण्यातील भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी १४ मे रोजी शरद पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा प्रकार समोर आला होता.त्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते गणेश नलावडे, दिपक पोकळे,रोहन पायगुडे,अजिंक्य पालकर,दीपक जगताप, संतोष जोशी, आप्पा जाधव,राजेंद्र अलमखाने,प्रसाद गावडे यांनी विनायक आंबेकर यांना त्या पोस्टबद्दल जाब विचारण्यासाठी थेट त्यांच ऑफिस गाठलं.

त्या ठिकाणी गेल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यावेळी आप्पा जाधव याने विनायक आंबेकर यांच्या कानाखाली मारली आणि त्यानंतर तेथून कार्यकर्ते निघून गेले. त्या प्रकरणी आप्पा जाधव यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली.

ADVERTISEMENT

शरद पवारांबाबत विकृत पोस्ट शेअर करणारी केतकी चितळे याआधी किती वेळा बरळलीय?

ADVERTISEMENT

हे प्रकरण थांबत नाही त्यावर भाजपच्या नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शहरात राजकीय आरोप प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व पक्षीय शहराध्यक्ष यांची बैठक घेऊन,शहरात शांतता आणि सलोखा कसा राहिल? यावर चर्चा केली आणि यावर सर्वांनी एकमत करून शहरात शांतता राहील अशी ग्वाही देखील दिली.

सतत वादात अडकणारी केतकी चितळे कोण?

मात्र आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आप्पा जाधव यांच्या ऑफिसमध्ये घुसून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आप्पा जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता,तो होऊ शकला नाही. या घटनेचा व्हीडिओही व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT