Govt Job: लाखोंचा पगार असलेल्या नोकरीसाठी करा अर्ज; फक्त 'ही' पात्रता असायला हवी!
NCRTC ने अॅक्झिक्यूटिव्ह पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार ncrtc.in या 'एनसीआरटीसी'च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
NCRTC कडून मोठ्या पदांसाठी भरती जाहीर
लाखोंपर्यंत मिळवू शकता पगार
काय आहे पात्रता?
NCRTC Recruitment: राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ (NCRTC) कडून मोठ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. NCRTC ने अॅक्झिक्यूटिव्ह पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार ncrtc.in या 'एनसीआरटीसी'च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
NCRTC च्या या भरतीच्या माध्यमातून एकूण ८ पदे भरली जाणार आहेत. जर या पदांशी संबंधित पात्रता असलेले उमेदवार 13 जुलै 2025 पर्यंत कधीही अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांनी भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणं आवश्यक आहे.
NCRTC च्या भरतीसाठी पात्रता
NCRTC च्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदानुसार शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे.
- BHM (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट)
- B.Tech / B.E (बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी / इंजीनियरिंग)
- LLB (बॅचलर ऑफ लॉ)
- BHA (बॅचलर ऑफ हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन)
- B.Plan (बॅचलर ऑफ प्लानिंग)
वयोमर्यादा
NCRTC च्या या भरतीसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचं कमाल वय 35 वर्षे असणं अनिवार्य आहे. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.










