Gold Medal: नीरज चोप्रा पुन्हा चॅम्पियन! रचला सुवर्ण इतिहास

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Neeraj Chopra Champion Again in World Athletics Championship
Neeraj Chopra Champion Again in World Athletics Championship
social share
google news

Neeraj Chopra World Athletics Championship : स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला. त्याने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. नीरजचा पहिला थ्रो जरी फाऊल झाला असला तरी, पण दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने 88.17 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. संपूर्ण सामन्यात इतर कोणत्याही खेळाडूला यापेक्षा पुढे भालाफेक करता आला नाही. (Neeraj Chopra Champion Again in World Athletics Championship)

बुडापेस्ट, हंगेरी येथे ही स्पर्धा झाली. पुरुषांच्या भालाफेकचा अंतिम सामना रविवारी (27 ऑगस्ट) झाला. या स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुसरे स्थान पटकावले. तिसऱ्या थ्रोमध्ये त्याने मिळवलेली प्रसिद्धी ही त्याची सर्वोत्तम थ्रो ठरली असती.

NCP: राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? 3O सप्टेंबरला फैसला,अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा खुलासा

भारतला ट्रॅक अँड फील्डमध्ये पहिले सुवर्ण पदक

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. तर, नीरज चोप्रा सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. तर नीरजने 2022 चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नीरजने पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी देखील पात्रता मिळवली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान खेळली जाणार आहे. नीरज व्यतिरिक्त भारताच्या डीपी मनू आणि किशोर जेना यांनी भालाफेकमध्ये अंतिम पदकासाठी झुंज दिली. पण किशोर पाचव्या आणि मनु सहाव्या जागेवरच राहिले.

Chhagan Bhujbal: बारामतीत यु टर्न ते तेलगी प्रकरण, छगन भुजबळांचा शरद पवारांवर प्रश्नांचा भडीमार

भारतीय नीरज चोप्राचे प्रयत्न

  • पहिला थ्रो- फाऊल
  • दुसरी थ्रो- 88.17 मी.
  • तिसरा थ्रो- 86.32 मी.
  • चौथा थ्रो- 84.64 मी.
  • पाचवा थ्रो- 87.73 मी.
  • सहावी थ्रो- 83.98 मी

Dhananjay Munde: अजितदादांसमोरच धनंजय मुंडेचा थेट सवाल, ‘शरद पवारांनी बीड जिल्ह्याला…,’

नीरज चोप्राने अभिनव बिंद्राची केली बरोबरी

मागील वर्ल्ड चॅम्पियनशिप अमेरिकेत झाली होती, ज्यामध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले होते आणि यावेळी तो येथे सुवर्णपदकाच्या दावेदारांपैकी एक होता. मात्र यावेळी त्याने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. यासह नीरजने भारताचा अनुभवी नेमबाज अभिनव बिंद्राच्या ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी केली आहे, त्याने ऑलिम्पिक आणि जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप या दोन्हीमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

ADVERTISEMENT

अभिनव बिंद्राने ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप या दोन्ही स्पर्धांच्या वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते आणि असे करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. 2008 ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा पहिला भारतीय ठरला. 2006 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारातही त्याने सुवर्णपदक जिंकले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT