Mumbai Local Video : लक्झरी कार सोडून उद्योगपतीचा मुंबई लोकलमधून प्रवास, कारण…
हिरानंदानी प्लॅटफॉर्मवर इतर प्रवाशांप्रमाणे ट्रेनची वाट पाहत आहेत. तसेच ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच ते एसी कोचमध्ये जाऊन बसतात. त्याच्यासोबत त्याच्या टीमचे काही सदस्यही उपस्थित होते.
ADVERTISEMENT
Billionaire Niranjan Hiranandani Travel Mumbai Local : मुंबई म्हटलं तर लोकल आलीच. मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत या लोकल प्रवासाचा आनंद लुटत असतो. आता याच लोकल प्रवासाचा अनुभव 73 वर्षीय उद्योगपती आणि हिरानंदानी ग्रुपचे सह-संस्थापक निरंजन हिरानंदानी यांनी घेतला आहे. या लोकल प्रवासाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान कोट्यवधी संपत्तीचे मालक आणि आलिशान कार ताफ्यात असताना देखील हिरानंदानी यांनी लोकल प्रवास केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (niranjan hiranandani billionare travels in mumbai local train viral video social media)
ADVERTISEMENT
हिरानंदानी ग्रुपचे सह-संस्थापक निरंजन हिरानंदानी यांनी गेल्या शुक्रवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मुंबई लोकलमध्ये प्रवास केल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत हिरानंदानी प्लॅटफॉर्मवर इतर प्रवाशांप्रमाणे ट्रेनची वाट पाहत आहेत. तसेच ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच ते एसी कोचमध्ये जाऊन बसतात. त्याच्यासोबत त्याच्या टीमचे काही सदस्यही उपस्थित होते. यावेळी एसी कोचच्या खिडकीच्या बाजूच्या सीटवर बसून ते आजूबाजूला बसलेल्या लोकांशी गप्पा मारत आहेत आणि हस्तांदोलनही करताना दिसत आहे.
हे ही वाचा : Maval Lok Sabha : ‘महायुतीचा उमेदवार मीच’, जागावाटपा आधीच शिंदेंच्या खासदाराने केली घोषणा
View this post on Instagram
हे वाचलं का?
निरंजन हिरानंदानी यांनी हा व्हिडिओ शेअर करून त्यांच्या लोकल प्रवासाचा अनुभवही सांगितला आहे. ‘वेळ वाचवण्यासाठी आणि मुंबईची प्रसिद्ध ट्रॅफिक टाळण्यासाठी ट्रेन पकडली. मुंबई ते उल्हासनगर हा एसी कोचमधील प्रवास हा एक व्यावहारिक वैयक्तिक अनुभव होता असे त्याने कॅप्शनमध्ये लिहले आहे.
हे ही वाचा : Sandeep Lamichhane : प्रसिद्ध क्रिकेटर बलात्कार प्रकरणात दोषी, ‘इतक्या’ वर्षाची होणार शिक्षा
दरम्यान निरंजन हिरानंदानी यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 22 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच कोट्यवधींची संपत्ती असूनही मुंबईच्या ट्रेनमध्ये सर्वसामान्य
प्रवाशांप्रमाणे प्रवास करण्याच्या निरंजन हिरानंदानी यांच्या निर्णयावर युजर्स कमेंट करत आहेत आणि त्यांचे कौतुक करत आहेत.
एका नेटकरऱ्याने या व्हिडिओवर कमेंट करताना हिरानंदानी यांना डाउन-टू-अर्थ म्हटले आहे, तर दुसऱ्या युझरने त्यांना आदर्श म्हणत भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
ADVERTISEMENT
नेटवर्थ किती?
हिरानंदानी ग्रुपचे एमडी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठे नाव निरंजन हिरानंदानी यांच्या नेट वर्थबद्दल सांगायचं झालं तर, फोर्ब्सच्या मते, त्यांच्याकडे 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच 12,487 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यांनी त्यांचे भाऊ सुरेंद्र हिरानंदानी यांच्यासोबत या ग्रुपची स्थापना केली होती. निरंजन हिरानंदानी यांना दोन मुले आहेत, तर त्यांच्या पत्नीचाही या व्यवसायात मोठा वाटा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT