चोरट्याला फुटला पाझर, 9 लाखांचं सोनं पुन्हा घरासमोर ठेवलं आणून; अन् म्हणाला…

मुंबई तक

ADVERTISEMENT

palghar theft thief returned stolen gold police emotional appeal intresting story
palghar theft thief returned stolen gold police emotional appeal intresting story
social share
google news

Palghar Crime Story: महम्मद हुसैन, पालघर: घरफोडी करून तब्बल 9 लाखांपेक्षा अधिक किंमतीचे चोरी केलेलं सोनं (Gold) चक्क चोरट्याने (thief) परत केल्याची आश्चर्यकारक घटना पालघरमधील (Palghar) केळवेमध्ये घडली आहे. चोरी केल्याची भावना चोरच्या मनाला बोचली आणि त्याला पाझर फुटला. ज्यानंतर त्याने चक्क चिठ्ठी लिहून माफी मागत चोरलेलं सोनं परत केल्याचं समोर आलं आहे. ‘माझ्याकडून अनावधानाने चूक झाली असून मला माफ करा.’ अशी चिठ्ठी लिहून या आरोपीने फिर्यादी महिलेच्या माहेरच्या घराच्या ओट्यावर चोरलेलं सोनं आणि चिठ्ठी आणून ठेवत फिर्यादींची चक्क माफी मागितली आहे. (palghar theft thief returned stolen gold police emotional appeal intresting story)

ADVERTISEMENT

खरं तर हा संपूर्ण प्रकार काहीसा अचंबित करणारा असला तरी पोलिसांच्या जनसंवाद अभियानाच हे यश असल्याचं पालघर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या संपूर्ण घटनेची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

चोराच्या मनाला कसा फुटला पाझर?

पालघर मधील केळवे येथील मांगेला वाडीत तांडेल दांपत्य मागील अनेक वर्षांपासून राहतात. 60 वर्षीय प्रतीक्षा तांडेल या गृहिणी असून त्यांचे पती ठकसेन तांडेल हे एका बँकेतील निवृत्त कर्मचारी आहेत. 31 मे रोजी तांडेल दाम्पत्यांच्या घरी त्यांच्या लग्न केलेल्या मुली माहेरी आल्या होत्या. रात्रीचं जेवण करून हे सर्व कुटुंबीय घराचा दरवाजा बंद करून शतपावलीसाठी समुद्रकिनाऱ्यावर गेले होते.

हे वाचलं का?

मात्र, घरी परतताच आपल्या घरात काहीतरी विपरीत घडल्याचं तांडेल दांपत्याला लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी कपाट उघडून पाहिलं तेव्हा त्यांना कपाटातील तब्बल 15 तोळं सोनं चोरीला गेलं असल्याचं समजलं. हे पाहून तांडेल दांपत्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

खरं तर आयुष्यभराची कमाई तांडेल दाम्पत्यांनी सोन्यात गुंतवणूक करुन केली होती. त्यामुळे तांडेल दांम्पत्य हे हतबल झालं आणि त्यांनी केळवे पोलीस ठाण्यात आपल्या घरात घरफोडी झाल्याची तक्रार नोंदवली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> कोल्हापुरात हिंसेचा उद्रेक! शरद पवारांचं गंभीर विधान; शिंदे, फडणवीस काय म्हणाले?

या प्रकरणी फिर्याद मिळताच केळवे पोलिसांनी तपास सुरू केला. शतपावलीसाठी गेलेलं तांडेल दांपत्य हे अवघ्या वीस मिनिटात घरी परतल्याने या वीस मिनिटातच हा चोरीचा प्रकार घडला असून चोरी करणारा हा जवळपासचाच कोणीतरी असल्याचा संशय पोलिसांना बळावला. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील नागरिकांना एकत्र बोलवत भावनिक साद घातली.

ADVERTISEMENT

खरं तर कोळी समाजाची एक वेगळी ओळख असून काहीही झालं तरी या समाजातील लोक चोरी करणार नाही, त्यामुळे चोरीचा कलंक आपल्या समाजाला लावून घेऊ नका असं भावनिक आवाहन परिसरात पोलिसांनी केलं. त्यानंतर अवघ्या तीन दिवसात प्रतीक्षा तांडेल यांचे भाऊ विश्वनाथ तांडेल यांच्या घराच्या ओट्यावर रात्रीच्या सुमारास चोरट्याने चोरलेलं सोनं पुन्हा आणून ठेवलं.

यावेळी या सोन्यासोबत एक चिठ्ठी देखील होती. ‘माझ्याकडून अनावधानाने ही चूक घडली असून मला माफ करा, मी चोरलेल सोनं समुद्रकिनाऱ्यालगत गाडून ठेवलं असल्याने त्यातील एक कॉइन गहाळ झाला आहे, त्यामुळे मला माफ करा.’ अशा आशयाची चिठ्ठी ठेवून या चोरट्याने फिर्यादींच सोनं परत केलं. त्यामुळे पालघर पोलिसांच्या सुरू असलेल्या जनसंवाद अभियानाचं हे यश असल्याचं पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

हे ही वाचा >> मुंबईतील उच्चभ्रू परिसरात तरूणीचा विवस्त्र मृतदेह, अजित पवार सरकारवर खवळले

चोरी झालेलं सोनं हे परत मिळेल याची तांडेल दांपत्यांना आशा कमीच होती. मात्र आपल्या आयुष्यभराची कमाई अवघ्या वीस मिनिटात चोरी झाल्याने तांडेल दांपत्याला मोठं दुःख झालं होतं. पण हेच सोनं अनपेक्षितरित्या परत मिळाल्याने झालेलं समाधान हे न सांगण्यासारखं असून पोलिसांचे आभार मानताना तांडेल दांपत्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.

चोरट्याने फिर्यादींची माफी मागत परत केलेलं सोनं ही घटना एकमेवाद्वितीय अशीच आहे. कारण आतापर्यंत अनेकदा चोरी झालेला मुद्देमाल परत मिळण्याची अपेक्षाचा फिर्यादी करत नाहीत. मात्र, पालघरमधील या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT