Pimpari Chinchwad : "लॉग आऊट नोट", असे लिहत मुलाने संपवलं जीवन,गूढ आत्महत्या!

मुंबई तक

ADVERTISEMENT

pimpari chinchwad news 16 year boy commit suicide for game shocking story
आत्महत्याग्रस्त मुलगा हा ऑनलाईन गेमच्या आहारी गेला होता.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आत्महत्याग्रस्त मुलगा हा ऑनलाईन गेमच्या आहारी गेला होता.

point

"लॉग आऊट नोट" अशी सुसाईड नोट लिहली होती.

point

मुलाच्या खोलीत काही स्केचेसही आढळले आहे.

Pimpari Chinchwad News :पिंपरी चिंचवडमध्ये एका 16 वर्षांच्या मुलाने राहत्या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्याग्रस्त मुलगा हा ऑनलाईन गेमच्या आहारी गेला होता. तसेच त्याने "लॉग आऊट नोट" अशी सुसाईड नोट लिहत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. मुलाच्या खोलीत काही स्केचेसही आढळले आहे. त्यामुळे मुलाच्या आत्महत्येचे गुढ वाढलं आहे. पोलीस ही संपूर्ण गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. (pimpari chinchwad news 16 year boy commit suicide for game shocking story)    

ADVERTISEMENT

पिंपरी- चिंचवड शहरातील किवळे परिसरात ही घटना घडली आहे. या परीसरातील एका इमारतीत हा आत्महत्याग्रस्त मुलगा त्याच्या आई वडिलांसोबत राहायचा. हा मुलगा गेमच्या आहारी गेला होता. या गेममुळेच त्याचं वागण खूप बदललं होतं.  XDअसे या गेमचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. यातून त्याने इमारतीच्या 14 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. घटनास्थळी एक सुसाईट नोट सापडली आहे. या सुसाईट नोटमध्ये  "लॉग आऊट नोट" असा मजकूर लिहण्यात आला होता. आता या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? याचा शोध पोलीस घेत आहे. तसेच या मजकूराचा गेमशी काही संबंध आहे का? हे देखील शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. 

हे ही वाचा : Bacchu Kadu : 'घरी बसून खा अन् घ्या 1500 रुपये', बच्चू कडूंच्या विधानाने महायुतीत नाराजी

आत्महत्याग्रस्त मुलाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यापासून मुलाच्या वागण्यात बदल झाला होता. त्याला काही विचारलं तर घाणेरड्या शब्दात तो प्रत्युत्तर द्यायचा.लॅपटॉप दिला नाही तर अंगावर देखील यायचा. एक आई म्हणून मला माझ्याच मुलाची भीती वाटायची असे त्यांनी सांगितले आहे. या आत्महत्येच्या घटनेने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ माजली आहे. 

हे वाचलं का?

XD या गेमच्या आहारी जाऊन मुलाने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मुलाने आपल्या नोटबूकमध्ये काही स्केच आणि मॅप काढले आहेत. तसेच आत्महत्या केलेल्या मुलाचं लॅपटॉपचा पासवर्ड मुलांच्या आई - वडिलांना माहिती नाही. त्यामुळे मुलाने नेमका कोणता गेम खेळून आत्महत्या केली?,हे तपास करण्याचं मोठ आव्हान पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर आहे. मुलाच्या आत्महतत्येचा तपासा करण्यासाठीं पिंपरी चिंचवड पोलीस सायबर एक्सपर्टची मदत घेणार आहेत. आता मुलाने त्या गेममुळेच आत्महत्या केली आहेत की? या आत्महत्येमागे वेगळे कारण आहे? याचा तपास आता पिंपरी चिंचवड पोलीस करीत आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana Form: लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होणार की नाही?, छाननी सुरू

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT