Budget 2024 : तरुण-तरुणींना महिन्याला 5000 रुपये! अर्थसंकल्पात मोठी घोषणा
Prime Minister Internship Yojana: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मोठ्या योजनेची घोषणा केली. तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी पंतप्रधान इंटर्नशिप कार्यक्रम योजना जाहीर केली जाणार आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
केंद्र सरकार तरुणांसाठी आणणार योजना
प्रशिक्षण काळात उमेदवारांना महिन्याला मिळणार ५००० रुपये
देशातील टॉप ५०० कंपन्यांमध्ये प्रशिक्षणाची संधी दिली जाणार
PM Internship Scheme : महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजना अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या धर्तीवर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने मोठ्या योजनेची घोषणा केली. देशातील सुशिक्षित तरुण-तरुणींना प्रशिक्षण देण्यासाठी एक योजना जाहीर केली जाईल. प्रशिक्षण काळात उमेदवारांना महिन्याला ५००० रुपये, तर वर्षाला ६० हजार रुपये दिले जाईल, अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
मोदी सरकारचीही योजना काय असेल?
महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेच्या धर्तीवर केंद्र सरकारही एक योजना जाहीर करणार आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात याची घोषणा केली.
हे वाचलं का?
हेही वाचा >> लाडका भाऊ योजनेचा जीआर करा डाऊनलोड, तरुणांनो पाहा पैसे कसे मिळतील!
देशातील १ कोटी तरुणाईला इंटर्नशिपची संधी देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक योजना जाहीर करेल. १ कोटी तरुणांना टॉप ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाईल. इंटर्नशिपच्या काळात उमेदवारांना महिन्याला ५००० रुपये दिले जाईल. तर एकत्रित 60 हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.
महिला आणि तरुणींसाठी ३ लाख कोटी
महिला आणि तरुणींना लाभ पोहोचवणाऱ्या योजनांसाठी ३ लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 पेक्षा अधिक शाखा सुरू केल्या जाणार आहेत.
ADVERTISEMENT
शिक्षण कर्जावर सूट
2024-25 च्या अर्थसंकल्पात २५ हजार विद्यार्थ्यांना अर्थ सहाय्य करण्यासाठी मॉडेल कौशल्य कर्ज योजनेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी ई व्हाऊचर दरवर्षी १ लाख विद्यार्थ्यांना ३ टक्के वार्षिक व्याजदराने दिले जाईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT