भाजपचा पुण्याचा चेहरा हरपला, गिरीश बापटांची प्राणज्योत मालवली

मुंबई तक

Girish Bapat Pass away: भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं आज (29 मार्च) प्रदीर्घ आजाराने पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये निधन झालं. आज प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

ADVERTISEMENT

BJP Pune MP Girish Bapat admitted to hospital
BJP Pune MP Girish Bapat admitted to hospital
social share
google news

Girish Bapat Passed away: पुणे: पुण्याचे (Pune) भाजपचे खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) यांचं निधन झालं आहे. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) उपचार सुरू होते. गेल्या अनेक दिवसांपासून गिरीश बापट यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, आज (29 मार्च) त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. निधनसमयी त्यांचं वय 72 वर्ष होतं. (pune bjp mp girish bapat admitted in icu at deenanath mangeshkar hospital pune he is on life support treatment)

थोड्या वेळेपूर्वीच दिनानाथ रुग्णालयाकडून गिरीश बापट यांच्या प्रकृतीबाबत हेल्थ बुलेटीन जारी करण्यात आलं होतं. यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर (Life Support Treatment) ठेवण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र, काही वेळापूर्वीच गिरीश बापट यांचं निधन झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अधिक वाचा- Girish Bapat: नगरसेवक ते पुण्यातील भाजपचा चेहरा, असा आहे गिरीश बापटांचा राजकीय प्रवास

कसबा पोटनिवडणुकीमुळे चर्चेत आलेले गिरीश बापट

गिरीश बापट यांची प्रकृती ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड खालवत आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत ते अधिक चर्चेत आले होते. कारण प्रकृती ठीक नसतानाही गिरीश बापट यांना भाजपने प्रचारात उतरवल्याचं पाहायला मिळालं होतं. नाकात ऑक्सिजन नळी लावून गिरीश बापट यांना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आणण्यात आलं होतं. जिथे त्यांना शब्द उच्चारणंही कठीण जात होतं. ज्यावरून भाजप नेत्यांवर बरीच टीका देखील झाली होती. मात्र, भाजपकडून त्यावेळी असा खुलासा करण्यात आला होता की, कसबा पेठ हा गिरीश बापटांचा पारंपारिक मतदारसंघ असल्याने त्यांनीच कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली होती. म्हणून त्यांना आणण्यात आलं होतं.

मात्र, स्वत: गिरीश बापट यांना प्रचारात उतरवल्यानंतरही कसबा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा मोठ्या मताधिक्याने पोटनिवडणुकीत पराभव केला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp