Pune : पुण्यात मद्यधुंद तरूणीचा धिंगाणा! पोलिसांवर हात उगारला, सोसायटीत राडा…
पुण्याच्या वानवडीतील ऑक्सफर्ड कंफोर्ट नावाची उच्चभ्रू सोसायटी आहे. या सोसायटीत नवीन वर्षाच्या आदल्या रात्री एका मद्यधुंद तरूणीने धिंगाणा घातल्याची घडना घडली होती. मद्यधुंद तरूणी तराट होऊन घराबाहेर पडली होती.
ADVERTISEMENT
Pune Drunk Girl News : संपूर्ण देशभरात सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या आगमनाचे स्वागत करण्यात आले होते. या दरम्यान विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सांस्कृतिक पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणीने मद्यधुंद अवस्थेत उच्चभ्रू सोसायटीत तुफान धिंगाणा घातल्याची घटना घडलीय. तरूणीने मद्यधुंद अवस्थेत सोसायटीतील नागरीकांना त्रास दिलाच, त्यासोबत तिला आवरण्यासाठी आलेल्या पोलिसांवर देखील तिने हात उगारल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्हीत कैद झाली होती.या प्रकरणात पीडीत तरूणी ही वरीष्ठ अधिकाऱ्यांची मुलगी असल्याने गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप झाला होता. मात्र आता गुन्हा दाखल झाला आहे. (pune drunk girl misbehave with society member and police case file wanavadi police station shocking story)
ADVERTISEMENT
पुण्याच्या वानवडीतील ऑक्सफर्ड कंफोर्ट नावाची उच्चभ्रू सोसायटी आहे. या सोसायटीत नवीन वर्षाच्या आदल्या रात्री एका मद्यधुंद तरूणीने धिंगाणा घातल्याची घडना घडली होती. मद्यधुंद तरूणी तराट होऊन घराबाहेर पडली होती. त्यानंतर तिने सोसायटीच्या गेटवर जाऊन सुरक्षारक्षकांशी झटापट करत त्यांना धक्काबुकी केली. त्यानंतर सोसायटीच्या गेटवर टेबल आणून टाकला. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.
हे ही वाचा : Shivsena : ठाकरेंच्या शिवसेना कार्यालयावर बुलडोझर, सांगलीत दोन गटात जबरदस्त राडा
मद्यधुंद तरूणी इतक्यावरच थांबली नाही तर पुढे सोसायटीच्या सुरक्षारक्षकांच्या खुर्च्यां भिरकावल्या. सोसायटीतील रहिवाशांना तिने मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. सोसायटीतील कोणत्याही नागरीकाला तिने गेटबाहेर जाऊ दिले नाही. या संपूर्ण प्रकरणात सोसायटीतील नागरीकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरूणी काही एक ऐकली नाही, त्यामुळे सोसायटीतील नागरीकांनी वानवडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती.
हे वाचलं का?
घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखळ झाले आणि त्यांनी तरूणीला आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र मद्यधुंद तरूणीने आरडाओरड करत धिंगाणा सुरुच ठेवला. यावेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केले असता त्यांनी तिने पोलिसांना देखील मारहाण केली आणि सरकारी कामकाजात अडथळा आणला. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवत तिला वठणीवर आणले होते.
हे ही वाचा : Jitendra Awhad : “शरद पवार हे पाण्यात रडणारा मासा, भुजबळ सुपारी घेतलेला पोपट”
या प्रकरणात 22 वर्षीय तरूणीवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणीने सोसायटीची एक काच देखील फोडली आहे. त्याबाबत तिच्यावर कारवाई करत नोटीस बजावली आहे. दरम्यान तरूणीचे वडील हे पोलीस निरीक्षण असून मागील 3 वर्षापासून मुलगी व पत्नीपासून विभक्त राहत आहेत.या प्रकरणी आता सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पतंगे यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT