Video : शेतकऱ्याने नादच केला…चक्क थार गाडीने नांगरली एक एकर शेती
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर (Indapur) तालुक्यातील लोणी देवकर येथील एका शेतकऱ्याने चक्क थार गाडीने आपली शेती नांगरलीय. या शेतकऱ्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या संपूर्ण राज्यभरासह इंदापूर तालुक्यात थार या गाडीचे शेतकऱ्यासह युवकांमध्ये मोठे आकर्षण आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात मान्सून दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) देखील शेती करण्यासाठी सज्ज झाला आहे. शेतकऱ्याने जमीन नागरायला सुरूवात केली आहे. कुणी बैलजोडीने जमीन नांगरतोय, तर कुणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमीन नागरत आहे. त्यात एका शेतकऱ्याने तर चक्क नांगराला थार गाडीच जुंपली आहे. आणि या थार गाडीच्या माध्यमातून शेतकरी जमीन नांगरतो आहे. इंदापूरमध्ये (Indapur) ही घटना घडली आहे.या घटनेत अनिल मधुकर तोंडे या य़ुवा शेतकऱ्याने थार गाडीच्या (Thar Car) माध्यमातून नागरणी सूरू केली आहे. दरम्यान अशाप्रकारे इतक्या महागड्या गाडीने तरूण नांगरणी करत असल्याने त्याची एकच चर्चा सुरू झाली आहे. या नांगरणीचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. (pune indapur farmer plowed the farm with a thar car video viral in social media)
ADVERTISEMENT
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर (Indapur) तालुक्यातील लोणी देवकर येथील एका शेतकऱ्याने चक्क थार गाडीने आपली शेती नांगरलीय. या शेतकऱ्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या संपूर्ण राज्यभरासह इंदापूर तालुक्यात थार या गाडीचे शेतकऱ्यासह युवकांमध्ये मोठे आकर्षण आहे. ही गाडी खरेदी करण्यासाठी तब्बल एक वर्षाहून अधिकचा काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. तेव्हा कुठेही गाडी खरेदीदाराला मिळते यावरूनच त्या गाडीची लोकप्रियता लक्षात येत आहे.
हे ही वाचा : Lonavala : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर टॅंकरला भीषण आग, चौघांचा होरपळून मृत्यू
हे वाचलं का?
अशा या गाडीने चक्क लोणीत देवकर येथील शेतकरी अनिल मधुकर तोंडे या युवा शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील नांगरणीसाठी उपयोग केला आहे. त्यामुळे तालुक्यात तरूणाच्या या अनोख्या नांगरणीची चर्चा रंगली आहे. युवा शेतकऱ्याने या गाडीने तब्बल एक दोन सऱ्या नव्हे तर जवळपास एक एकर क्षेत्र थार या गाडीच्या साह्याने नांगरले आहे. गाडीला मागील बाजूस बैलाच्या साह्याने नांगरट करणारा नांगर दाव्याच्या साहाय्याने जोडून नांगरणी केलीय.
या दणकट गाडीच्या साह्याने आपण शेती नांगरट करून पाहूया असा विचार मनात आल्याने त्यांनी जवळपास एक एकर क्षेत्राची नांगरट करून पाहिली. ट्रॅक्टरच्या तुलनेत गाडीने नांगरट करण्यास अधिकचा खर्च आला परंतू गाडीची कार्यक्षमता पडताळले असता गाडी दणकट असून, या गाडी विषयी आणखी विश्वास बसल्याच अनिल तोंडे यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका टळलेला नाही, पाहा Live Tracker मधून क्षणाक्षणांचे अपडेट
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT