पुणे : अंगनवाडी सेविकेने 20 लहान मुलांना रुममध्ये कोंडलं अन् निघून गेली, मुलांच्या रडण्याचा आवाज आला अन्...
Pune News : पुणे : अंगनवाडी सेविकेने 20 लहान मुलांना रुममध्ये कोंडलं अन् निघून गेली, मुलांच्या रडण्याचा आवाज आला अन्...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे : अंगनवाडी सेविकेने 20 लहान मुलांना रुममध्ये कोंडलं,
मुलांच्या रडण्याचा आवाज आला अन्...
Pune News : पुणे जिल्ह्यातील हिंजेवाडी परिसरात अंगनवाडी सेविकेच्या निष्काळजीपणामुळे खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. 26 नोव्हेंबर) दुपारी 11 ते 12 या वेळेत दोन कर्मचाऱ्यांनी तब्बल 20 लहान मुलांना अंगनवाडीच्या खोलीत बंद करून स्वतः ग्रामपंचायतीच्या बैठकीसाठी निघाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. याचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिक आणि पालक वर्गात संताप उसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंगनवाडी कार्यकर्ती सविता शिंदे आणि सहायिका शिल्पा साखरे यांना ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचांनी एका बैठकीसाठी बोलावले होते. त्याच वेळेस अंगनवाडीचे कामकाज सुरू होणार होते. मुलांच्या देखरेखीची कोणतीही व्यवस्था न करता दोन्ही कर्मचारी मुलांना आतमध्ये ठेवून दरवाजाला बाहेरून कुलूप लावून निघून गेल्या. जवळपास एक तास लहान मुले त्या बंद खोलीत एकटीच राहिली. भीती आणि एकटेपणाने त्रस्त झालेली ही मुले मोठ्याने रडत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
हेही वाचा : मोठी बातमी : एकनाथ शिंदेंसोबत जाण्यासाठी 'त्या' आमदाराने 50 कोटी घेतले, भाजप आमदाराने नाव सांगितलं
घटनेविषयी विचारणा केल्यावर दोन्ही कर्मचाऱ्यांनी निष्काळजी उत्तर देत, “माजी सरपंचांनी बैठक बोलावली होती म्हणून आम्ही कुलूप लावलं,” असे सांगितले. मुलांचे रडणे आणि खोलीतून येणारा आवाज ऐकणाऱ्या नागरिकांनी तात्काळ मुलशी पंचायत समितीच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिरम यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली. अधिकारी गिरम यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन दोन्ही कर्मचाऱ्यांना तात्काळ बैठक सोडून परत येण्याचे निर्देश दिले. आदेश मिळताच सेविका आणि सहायिका धावत आंगनवाडीत परतल्या आणि ताळे उघडून मुलांना बाहेर काढले.










